Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

आंबेघर-आमडोशी रस्ता दुरुस्तीला मुहूर्त

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ नागोठणे ः प्रतिनिधी रोहे-नागोठणे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरवठा केला होता. परिणामी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आता जाग …

Read More »

रायगडात 77 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, रविवारी (दि. 6) नव्या 77 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 59 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 45 व ग्रामीण 9) तालुक्यातील 54, पेण नऊ, महाड सहा, खालापूर व रोहा तालुक्यातील प्रत्येकी तीन …

Read More »

राज्य सरकारकडून कोळी बांधवांची फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल अलिबाग ः प्रतिनिधीचालू वर्षात अनेक वादळे आली. त्यात कोळी बांधवांचे नुकसान झाले. त्यांना नुकसानभपाई द्यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती, मात्र महाविकास आघाडी सरकारने कोळी बांधवांना मदतीच्या नावाने ठेंगा दिला. त्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी नेमलेल्या हरिदास कमिटीचा अहवाल दाबून ठेवला. या …

Read More »

पोलादपुरात भुईमूग पिकाची लागवड यशस्वी

लहुळसे येथील शेतकर्‍यांनी घेतले भातापेक्षा चौपट उत्पन्न पोलादपूर : प्रतिनिधी पारंपरिक भात पिकाला पर्यायी पीक म्हणून पोलादपूर तालुक्यातील लहुळसे येथील दोन प्रगतीशील शेतकर्‍यांनी  खरीप हंगामात आपल्या शेतात मोरणा व वारणा जातीच्या भुईमूग बियाण्याची लागवड करुन एकरी 10 क्विंटल उत्पन्न घेतले आहे. भात पिकाबरोबर शेतकर्‍यांनी भुईमूग पिकाची लागवड करावी, असे आवाहन …

Read More »

चोराटी दारू वाहतूक प्रकरणी दोघेजण ताब्यात

अलिबाग : प्रतिनिधी डस्टर कारमधून विक्रीसाठी चोराटी दारू आणणार्‍या दोघाजणांना उत्पादन शुल्क विभागाच्या अलिबाग येथील अधिकार्‍यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले आहे. मॅक्डोल आणि डीएसपी मद्याच्या बॉटल आणि कार असा लाखोंचा माल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. अलिबाग उत्पादन शुल्क विभागाला दिव दमन येथील दारू घेऊन काहीजण अलिबागेत येत …

Read More »

देना बँकेच्या कळंब शाखेचे काम थंडावले

समायोजन आणि इंटरनेटअभावी खातेदारांची गैरसोय कर्जत : बातमीदार वेळोवेळी डिस्कनेट होणारे इंटरनेट तसेच दोन बँकांच्या समायोजनामुळे देना बँकेच्या कळंब (ता. कर्जत) शाखेतील सर्व व्यवहार थंडावले आहेत. त्यामुळे कळंब परिसरातील 25-30 गावे, वाड्यामधील खातेदारांना बँकेतून हात हलवत घरी परतावे लागत आहे. कर्जत तालुक्यातील कळंब येथे 1990च्या दशकात देना बँक आली. बँकेच्या …

Read More »

नागोठणे ते आमडोशीफाटा मार्गाची दुरवस्था

9 डिसेंबरपासून रस्ता बंद करण्याचा मनसेचा इशारा नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे – रोहे मार्गातील नागोठणे ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र संबंधित विभागाकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 9) सकाळी दहा वाजल्यापासून सदरचा रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा रोहे तालुका मनसेचे पदाधिकारी प्रल्हाद पारंगे, विनायक …

Read More »

रायगडात 133 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 4) नव्या 133 पॉझिटिव्ह रुग्णांची व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 128 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 17) तालुक्यातील 98, पेण व रोहा प्रत्येकी सात, खालापूर, अलिबाग, माणगाव येथे प्रत्येकी चार, श्रीवर्धन तीन, उरण …

Read More »

भाजप किसान मोर्चाची रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नऊ मंडळ अध्यक्ष आणि 25 कार्यकारिणी सदस्य कर्जत ः बातमीदारभारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांनी जाहीर केली. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी किसान मोर्चाच्या कार्यकारिणीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर अध्यक्ष म्हसे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. दरम्यान, भाजप किसान मोर्चाच्या उत्तर रायगड …

Read More »

‘रोटरी’तर्फे दिव्यांगांसाठी मार्गदर्शन चर्चासत्र

पेण : रामप्रहर वृत्त जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पेणने आई डे केअर संस्था संचलीत मतिमंद मुलांसाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र पेण येथील दिव्यांग विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चेसाठी पेणमधील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.सोनाली वनगे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमांतर्गत …

Read More »