कर्जत : बातमीदार तालुक्यातील कुस्तीच्या परंपरेला काही दशकांचा इतिहास आहे आणि कुस्तीसाठी येथे पोषक वातावरणही आहे, त्यामुळे कर्जत तालुक्यातील मल्ल राष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा विश्वास राष्ट्रीय कुस्तीपटू संदीप वांजळे यांनी येथे व्यक्त केला. कर्जत तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष भगवान धुळे यांनी आर्थिक भार उचलून खरेदी केलेल्या मॅटचे लोकार्पण नुकताच अशोक …
Read More »फी कपात करण्यास राठी इंग्लिश स्कूलचा नकार
रोहे : प्रतिनिधी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कपात करण्यास स्पष्ट नकार दिल्याने रोहे येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या फीबाबत निर्माण झालेला तिढा कायम आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांना मोठा खर्च सोसावा लागत आहे. यामुळे पालकांना …
Read More »व्यवस्थापन आणि संघटनेमधील वाटाघाटी निष्फळ; ‘रिलायन्स’विरोधातील आंदोलनाला स्थानिक सरपंचांचा सक्रिय पाठिंबा
नागोठणे : प्रतिनिधी रिलायन्स व्यवस्थापन आणि लोकशासन संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली असून, मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. दरम्यान येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी 27नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने मागील शुक्रवारपासून …
Read More »रायगडात 140 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 2) नव्या 140 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 199 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 75 व ग्रामीण 20) तालुक्यातील 95, उरण 17, खालापूर आठ, माणगाव सात, पेण पाच, अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि …
Read More »पेण-खोपोली मार्गावर तिहेरी अपघात; दोन जण जखमी
पेण : प्रतिनिधी पेण खोपोली रस्त्यावर गागोदे गावच्या हद्दीत मोटरसायकल चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याच्या मागून येणार्या मोटरसायकल स्वारास अपघात झाला. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी कि, मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 :30 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी (रा. सोरडी ता. जत जिल्हा सांगली) …
Read More »रायगडात नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग
अलिबाग ः प्रतिनिधीजानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणार्या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, व पोलादपूर या नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे तेथील राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रशासनही सज्ज होत …
Read More »माथेरानची माहिती आता एका क्लिकवर!
पर्यटनविषयक अॅप लवकरच होणार लाँच कर्जत ः बातमीदारमाथेरानमध्ये येणार्या पर्यटकांच्या माहितीकरिता एक अॅप तयार करण्यात येत असून, याच महिन्यात त्याचे लाँचिंग केले जाणार आहे. माथेरान गिरीस्थान नगर परिषद आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्या माध्यमातून बहुपर्यायी अशा या अॅपची निर्मिती केली जात आहे.निसर्गरम्य प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालते. …
Read More »येमेनमध्ये फसलेल्या 14 भारतीयांसाठी जीएमबीएफ ठरले देवदूत
अलिबाग : प्रतिनिधी आखाती देशात नोकरी किंवा व्यावसायिक म्हणून स्थायिक झालेल्या भारतीयांना डॉ. सुनील मांजरेकर अध्यक्ष असलेल्या जीएमबीएफ फोरम या संघटनेचा फार मोठा आधार आहे. याची प्रचिती सौदी अरेबियात येमान मध्ये फसलेल्या 14 भारतीयांना आली. तब्बल 10 महिन्यानंतर या 14 जणांची जीएमबीएफ फोरमचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, चंद्रशेखर भाटिया, समाजसेविका …
Read More »माणगावमधील शेतकरी मदतीपासून वंचित
माणगाव ः प्रतिनिधीमुरूडप्रमाणेच माणगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांनाही राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होऊन तब्बल दोन महिने लोटले तरीही मदत मिळाली नसल्याने बाधीत शेतकरी हवालदिल झाले आहेत.माणगाव तालुक्यातील 2162.71 हेक्टर क्षेत्रामधील पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या 8343 शेतकर्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह …
Read More »हुतात्मा भाई कोतवाल यांना माथेरानमध्ये अभिवादन
कर्जत : बातमीदार वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची 108 वी जयंती मंगळवारी (दि. 1) माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी माथेरानकरांनी हुतात्मास्मारक येथून सकाळी मशाल फेरी काढली होती. त्यांच्या जन्मस्थळी हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम हाती घेण्यात आला …
Read More »