Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

श्रीक्षेत्र महड येथील पथदिवे बंद

खोपोली : प्रतिनिधी – अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायकाचे मंदिर आहे. येथील मुख्य कमानीपासून मंदिरापर्यंतचे पथदिवे बंद आहेत. मंदिराच्या परिसरात मुख्य रस्त्यावर स्वागत कमान आहे. तिथूनच पथदिवे लावण्यात आलेले असून, सद्यस्थितीत ते बंद आहेत. महड हे खालापूर नगरपंचायत हद्दीत असल्याने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे, मात्र …

Read More »

रान अळंबी बाजारात दाखल

माणगाव : प्रतिनिधी – पावसाळ्यात उगवणार्‍या रान भाज्यांपैकी खवय्यांची पसंती असलेली रान अळंबी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. भूछत्रसारख्या असलेली ही अळंबी पावसाळ्यातील ठराविक दिवसांतच उगवते. त्यामुळे या अळंबीला बाजारपेठेत चांगली मागणी असते. पावसाळ्यातील विशिष्ट दिवसांत रानात उगवणारी अळंबी रुचकर असते. त्यामुळे खवय्यांची या अळंबीला पसंती असून, अनेक जण तिची …

Read More »

मुरूडमध्ये पोलिसाने केली कोरोनावर मात; सहकार्यांकडून जोरदार स्वागत

मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग तसेच प्रशासनातील विविध घटक अहोरात्र मेहनत घेत आहेत, मात्र यातील काही योद्द्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. अशाच प्रकारे मुरूड पोलीस ठाण्यातील शिपाई परेश म्हात्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पनवेलमधील कोविड केअर सेंटर तसेच मरोळ (मुंबई) येथील सेवन …

Read More »

रायगडात रुग्ण संख्या 12 हजार पार

पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना वेगाने फोफावत असून, बघता बघता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येने 12 हजारांचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील मृत्यूदरदेखील वाढत असून गुरुवार (दि. 23)अखेर कोरोनाने 323 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता दिवसागणिक वाढत आहे. अशात जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे सात हजार 960 …

Read More »

उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह

अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन कोरोना संकटाच्या काळात ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ऐन पावसाळ्यात या परिसरातील गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त …

Read More »

रायगडातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2पर्यंत सुरु राहणार : जिल्हाधिकारी

अलिबाग : प्रतिनिधीजिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाऊनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने/आस्थापना सकाळी 6 ते सकाळी 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र आता मूळ लॉकडाऊन आदेशात सुधारणा करुन रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात …

Read More »

टपरीधारकांना त्वरित नुकसान भरपाई द्या : अरविंद गायकर

मुरुड : प्रतिनिधी मुरुड शहरातील समुद्रकिनारी 44 टपरीधारक व छोटे दुकानचालक असून निसर्ग चक्रीवादळात वार्‍याच्या प्रचंड वेगाने वारे वाहिल्यामुळे सर्व दुकाने आडवी होऊन प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी पाच लाख मुरुड तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत. कागदपत्रांची पडताळणी केल्यावर हे वाटप करण्यात येणार होते. परंतु महसूल विभागाने सीआरझेड कायद्याच्या अडचणीमुळे …

Read More »

व्यापार्‍यांची कोरोना तपासणी होणे आवश्यक : संजयआप्पा ढवळे

माणगाव : प्रतिनिधी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी माणगाव तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गाची कोविड चाचणी करून घेणे आवश्यक असल्याची मागणी माणगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केली आहे. संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, जनतेचा संपर्क हा व्यापारी वर्गाशी अधिक प्रमाणात येत असतो. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू …

Read More »

खोपोलीच्या प्रभारी मुख्याधिकारी पहिल्याच दिवशी ’अ‍ॅक्शन’मध्ये; बेशिस्त दुकानदारांवर कारवाई

खोपोली: बातमीदार खोपोली नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव जोरात सुरू आहे. यात मुख्याधिकारी गणेश शेट्येही सुटलेले नाहीत. त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आत्ता त्यांच्या जागी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून खालापूरच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे बुधवारी खोपोलीचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी यांनी सुपूर्द केला आहे. गुरुवारी मुख्याधिकारी भणगे यांनी पहिल्याच दिवशी सकाळी खोपोली बाजारपेठ …

Read More »

निजामपूर रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य

माणगाव: प्रतिनिधी माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरातून दिघी- पुणे महामार्ग व मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहराच्या सौंदर्यात व व्यावसायिक उत्पन्नात भर पडत आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून माणगांव शहरात दिघी-पुणे महामार्गावर रेल्वे क्राँसिंग ब्रीज आहे. या ब्रीज खालूनच पुणे-दिघी महामार्ग म्हणजेच माणगांवकरांचा निजामपूर रोड आहे. …

Read More »