Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

विविध मागण्यांना मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील; महाव्यवस्थापकांना काळे झेंडे न दाखविण्याचा नेरळ प्रवासी संघटनेचा निर्णय

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना आक्रमक झाली होती, मात्र त्यांच्या अनेक मागण्या मध्य रेल्वे प्रशासनाने मान्य केल्या आहेत. दरम्यान, मागण्या मान्य झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविणार नाही, असे प्रवासी संघटनेने जाहीर केले आहे. नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना गेली …

Read More »

वणवे उठताहेत वनसंपदेच्या मुळावर; पशुपक्षी, ऐतिहासिक वारसेदेखील धोक्यात; ठोस उपाययोजना करण्याची गरज

पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात माळरान, गडकिल्ले, जंगल भागात मोठ्या प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते, मात्र ऑक्टोबरनंतर ही झाडीझुडपे व गवत सुकते आणि कळतब नकळत डोंगराला वणवा लागतो. रायगड जिल्ह्यात दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर असे वणवे लागतात. या वणव्यात झाडेझुडपे, पशुपक्षी, सूक्ष्म जीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू होतो. …

Read More »

रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात

पेण ़: प्रतिनिधी रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा सहावा वर्धापन दिन संघाचे अध्यक्ष स. रा. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या संघाच्या वटवृक्ष या स्मरणिकेचे प्रकाशन सोबती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदे मातरम् शाळेच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची खालापूर येथे बैठक

कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक नुकतीच सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर येथील प्रगतशील शेतकरी नारायण बाळकृष्ण जगताप यांच्या शेतावर घेण्यात आली. प्रत्येक तालुका कृषी कार्यालयात स्थापन झालेल्या मार्गदर्शन केंद्राचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. …

Read More »

अलिबागेत वीजवाहिन्या होणार भूमिगत

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहरात  वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले असून, दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. वीजवाहिन्या भूमिगत झाल्यानंतर अलिबाग शहरात विजेच्या तारा तुटून, खांब कोसळून अपघात होण्याचा धोका टळणार आहे. चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वरून जाणार्‍या विजेच्या तारा तुटून, पोल कोसळून अनेक प्रकारे …

Read More »

कशेडी घाटात पुन्हा केमिकल सोडले पोलादपूर पोलिसांकडून दोघांना अटक

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत टँकरमधील केमिकल सोडण्याची तिसरी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, मात्र या वेळी गस्त घालणार्‍या पोलादपूर पोलिसांनी टँकरमधील दोघांना घटनास्थळी पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा आधीच्या दोन घटनांशी संबंध आहे का याची चौकशी पोलादपूर पोलीस करीत आहेत.महामार्गावरील पार्ले आणि पार्लेवाडी गावानजीक 28 …

Read More »

खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत कायम

तीन वर्षांच्या मुलाचा तोडला लचका खालापूर : प्रतिनिधी खोपोलीतील सोमजाईवाडी येथे मंगळवारी (दि. 4) सकाळी तीन वर्षांच्या मुलाचा कुत्र्याने लचका तोडला. श्रेयस गुरव असे बालकाचे नाव असून, कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूचे मांस निघाले आहे. या घटनेत सुदैवाने त्याचा डोळा वाचला आहे. खोपोली शहरात सध्या कुत्र्यांचा हैदोस …

Read More »

ग्रामपंचायत कर्मचार्यांची उद्या जिल्हा परिषदेवर धडक

प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी आंदोलनाचे हत्यार अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी गुरुवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आयटकशी संलग्न रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ऑनलाइन वेतन सुरू झाले आहे, मात्र …

Read More »

सुधागडातील मोबाइल टॉवर्स सील

महसूल विभागाची कारवाई; थकबाकीदार कंपन्यांना शिकवला धडा पाली : प्रतिनिधी मोबाइल कंपन्यांच्या सुधागड तालुक्यातील एकूण 11 टॉवर्सला  महसूल प्रशासनाने 1 आणि 3 फेब्रुवारीला सील लावले आहे. तालुक्यातील प्रत्येक मोबाइल टॉवर कंपनीकडे 51 हजार 950 म्हणजे एकूणच चार लाख 67 हजार 550 रुपयांची थकबाकी होती. आदिवासीबहुल सुधागड तालुक्यात मोबाइल नेटवर्क व …

Read More »

प्लास्टिक बॅगविरोधात जनजागृती

गोेरेगावमधील नायडू प्री स्कूलची रॅली; कापडी पिशव्यांचे वाटप माणगाव : प्रतिनिधी नायडू प्री स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी माणगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये प्लास्टिक बॅगविरोधात रॅली काढून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे आवाहन केले, तसेच कापडी पिशव्यांचे वाटप केले. गोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर नायडू प्री स्कूलच्या चिमुकल्यांनी सरपंच जुबेर अब्बासी व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसमोर नाटुकली सादर करून …

Read More »