भारतीय खाद्य निगमकडून तहसीलदारांना निवेदन कर्जत : बातमीदार तालुक्यातील रेशन दुकानांत ग्राहकांना आजही अनेक सुविधा मिळत नसून, अनेक त्रुटी असल्याने ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत भारतीय निगम मंडळाने कर्जत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय धारक, केशरी कार्ड, एपीएल या रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानांतून अन्नधान्य दिले …
Read More »पेण ग्रामीण रुग्णालय ‘अत्यवस्थ’
विविध समस्यांमुळे रुग्णांनी फिरवली पाठ पेण : प्रतिनिधी जेथे रुग्णांनी उपचार घ्यायचे ते पेण येथील ग्रामीण रुग्णालयच विविध समस्यांमुळे आजारी पडले आहे. त्यामुळे रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घेण्याचे सोडून खासगी ठिकाणी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. पेणच्या शासकीय ग्रामीण तथा उपजिल्हा रुग्णालयात बर्याच वेळा फक्त रिकाम्या खाटा रुग्णांची वाट बघत …
Read More »सुधागडातील टॉवर कंपन्या वठणीवर
महसुली दणक्यानंतर कर थकबाकी भरण्यास तयार पाली : प्रतिनिधी कर थकविल्यामुळे महसूल विभागाने मोबाईल कंपन्यांचे सुधागड तालुक्यातील 11 टॉवर सील केले होते. या दणक्याने जाग आलेल्या मोबाईल कंपन्यांनी सर्व कर भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे सील काढण्यात आले. सुधागड तालुक्यात वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे अनेक टॉवर असून, त्यापैकी काही कंपन्यांकडे एकूण पाच …
Read More »भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात समस्या
स्थानिक प्रवासी संघटनेचे प्रशासनाला निवेदन कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील भिवपुरी रोड हे सध्या महत्वाचे स्थानक बनले आहे. या स्थानकातील समस्यांबाबत तेथील रेल्वे प्रवासी संघटनेने मुंबईत जाऊन मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी नुकताच मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक गोयल यांची नुकताच …
Read More »नेरळमध्ये शौचालयाच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
कर्जत : बातमीदार नेरळ येथील शिंदेवाडी भागात शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू तसेच गुन्ह्याची नोंद केली आहे. धनीराम नामक कामगार 28 जानेवारी रोजी शौचालयाच्या टाकीत स्वच्छता करण्यासाठी उतरला होता. काम होऊनही मलमूत्राची दुर्गंधी बाहेर येतच असल्याने …
Read More »मिस-मिसेस रायगड क्विन स्पर्धेस उदंड प्रतिसाद
महाड : प्रतिनिधी वेदा जनजागृती मंच आयोजित मिस, मिसेस रायगड आणि मिस, मिसेस महाड क्विन स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. महाडच्या इतिहासात प्रथमच झालेल्या स्पर्धेत महाडकर, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक महिलांनीही रॅमवॉक अनुभवला. मिसेस इंडिया राखी सोनार यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. वेदा जनजागृती मंचच्या वतीने महिलांतील सुप्तगुणांना वाव मिळावा …
Read More »माणगावजवळ दोन ट्रेलरची धडक; चालक जखमी
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. 5) सकाळी दोन ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक ट्रेलरचालक जखमी झाला आहे. मुंबईकडून पॉस्को कंपनीकडे निघालेला ट्रेलर (एमएच-46, एएफ-1719) आणि कंपनीतून मुंबईकडे निघालेला ट्रेलर (आरजे-51, जीए-1560) या दोन गाड्यांमध्ये विळे पेट्रोलपंपासमोर बुधवारी सकाळी आठ वाजता समोरासमोर जोरदार धडक …
Read More »पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; दोन मुले जखमी
श्रीवर्धन ़: तालुक्यातील भरडखोल ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. या कुत्र्याने मंगळवारी (दि. 4) दुपारी केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुले जखमी झाली असून, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावात पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत निर्माण केली असून, त्याने आजतागायत पाच ते सहा व्यक्तींवर हल्ला …
Read More »वाळू वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई
महाड : प्रतिनिधी तालुक्यात टोळ फाटा ते बंदर यादरम्यान मंगळवारी (दि. 4) वाळू वाहतूक करणार्या पाच वाहनांवर महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे या परिसरात अनधिकृत वाळू व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. महाड खाडीपट्टा विभागातील टोळ …
Read More »विविध मागण्यांना मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील; महाव्यवस्थापकांना काळे झेंडे न दाखविण्याचा नेरळ प्रवासी संघटनेचा निर्णय
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना आक्रमक झाली होती, मात्र त्यांच्या अनेक मागण्या मध्य रेल्वे प्रशासनाने मान्य केल्या आहेत. दरम्यान, मागण्या मान्य झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविणार नाही, असे प्रवासी संघटनेने जाहीर केले आहे. नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना गेली …
Read More »