Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

…तर ‘जेएसडब्ल्यू’विरोधात आंदोलन

आमदार रविशेठ पाटील यांचा कंपनी प्रशासनाला इशारा पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीने स्थानिकांबाबत निर्माण केलेल्या प्रश्नांकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यात कंपनी व्यवस्थापनाने सुधारणा केली नाही तर कंपनीविरोधात आंदोलन करू, मोर्चा आणू, कंपनीचे गेट बंद करू असा इशारा पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे दिला. जेएसडब्ल्यू कंपनी बाधित कार्यकर्त्यांची …

Read More »

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर्स अव्वल

रेवदंडा ः प्रतिनिधीरायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशनद्वारा रेवदंडा हरेश्वर मैदान येथे बुधवारी (दि. 22) आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर्स संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय खोपोली फोटोग्राफर्स, तृतीय पोयनाड फोटोग्राफर्स आणि चतुर्थ क्रमांक अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने मिळविला. स्पर्धेत अष्टपैलू खेळ करून दाखवत पेण संघाच्या शैलेश …

Read More »

निधी चौधरी रायगडच्या नव्या जिल्हाधिकारी

अलिबाग : प्रतिनिधी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हाधिकारीपदाचा पदभार बुधवारी (दि. 22) स्वीकारला. चौधरी या 2012च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. चौधरी यांनी मुंबई महापालिकेत उपायुक्त, उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी त्यांनी रायगड जिल्ह्यात पेण प्रांताधिकारी म्हणून कामकाज हाताळले …

Read More »

रिस हद्दीत स्त्रीचा सांगाडा

मोहोपाडा, खालापूर : प्रतिनिधी रिस-कांबे येथील श्री वैष्णोनगरीच्या काही अंतरावर असलेल्या कातरीच्या माळावर एका स्त्रीचा सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात महिलेला निर्मनुष्य जागेत जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत तिथेच टाकण्यात आल्याचे दिसते. यासंदर्भात रसायनी पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे, सहाय्यक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील पथकासह …

Read More »

इंटरनेटअभावी पोस्टातील सेवा कुचकामी

पोलादपूर : प्रतिनिधी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) इंटरनेट सेवा गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने पोलादपूर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे या पोस्टातील कर्मचार्‍यांना असंख्य ग्राहकांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे. पोलादपूर पोस्ट ऑफिसमध्ये 15 जानेवारीपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा अनियमित सुरू असून अनेकदा ही सुविधा ठप्प होत आहे. त्यामुळे …

Read More »

कर्जतमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका

किरवलीतील सुरेश लाड यांच्या कार्यकर्त्यांचा राम राम कर्जत : बातमीदार तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी आमदार सुरेश लाड यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत एकत्र असताना इकडे कर्जतमध्ये मात्र एकमेकांवर कुरघोडी …

Read More »

नेरळमध्ये नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर

कर्जत : प्रतिनिधी निहरिका फाऊंडेशनच्या करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे नेरळ जिते फाटा येथील कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात 100 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आरपीआयचे कोकण विभाग सचिव मारुती गायकवाड, आगरी समाज संघटनेचे सचिव शिवराम बदे, कोल्हारे ग्रामपंचायतीचे …

Read More »

स्वीकृत नगरसेवकपदावर काँग्रेसचा दावा

मुरूडमध्ये महाआघाडीत पेच मुरूड : प्रतिनिधी नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवकपद काँग्रेस पक्षाला मिळाले पाहिजे, अशी मागणी त्या पक्षाचे मुरूड शहर अध्यक्ष श्रीकांत गुरव यांनी केली आहे. त्यामुळे मुरूडमध्ये महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शेकाप या तीन पक्षांनी आघाडी करून मुरूड नगर परिषदेची 2016ची सार्वत्रिक निवडणूक लढविली …

Read More »

टाटा स्टीलने केली 25 हजार झाडांची लागवड; वेगवेगळ्या 29 प्रकारची रोपे

खालापूर : प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएल (आधीची भूषण स्टील) कंपनीने  खालापूर तालुक्यातील सावरोली येथील आपल्या कारखान्याच्या परिसरात मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्प सुरू केला असून, या प्रकल्पामध्ये एन्व्हायरो क्रिएटर फाऊंडेशनच्या तांत्रिक सहयोगाने दोन एकर जमिनीवर तब्बल 25 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये 29 वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. टाटा …

Read More »

कशेडी घाटात ओतले टँकरमधील केमिकल

पोलादपूर तालुक्यामधील महिनाभरातील दुसरी घटना पोलादपूर : प्रतिनिधी कशेडी घाटातील भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पार्टेवाडी येथील दरीच्या बाजूला एका अज्ञात टँकरमधील केमिकल ओतल्याची घटना बुधवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील पार्टेवाडी येथील प्रतापगड दर्शन फलकाजवळ दरीच्या बाजूला एका अज्ञात केमिकल टँकरमधील केमिकल …

Read More »