Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

उन्हाने तप्त गवत घेतंय पेट

रानवडी येथील वणवा विझवण्यात यश पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर चरई बोरावळे मार्गालगतच्या रानवडी ते घागरकोंड रस्त्यालगत दुपारच्या उन्हाने तप्त गवतावर सायंकाळी अज्ञात व्यक्तीने बिडीकाडी, सिगारेटसारख्या वस्तू भिरकावल्याने गवत पेटून त्याचे वणव्यात रूपांतर झाले. यामुळे परिसरातील लोकवस्तीलाही धोका निर्माण झाला, मात्र सरपंच आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या वणव्यावर नियंत्रण मिळविले. …

Read More »

रेवदंडा ते बेलकडे रस्ता चकाचक

साइडपट्टीला स्वच्छतेचा लूक; श्रीसदस्यांचे भरीव श्रमदान रेवदंडा ः प्रतिनिधी स्वच्छतादूत ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने रेवदंडा ते बेलकडे मुख्य रस्त्यावर रविवारी (दि. 19) सकाळी श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामुळे रेवदंडा-बेलकडे मुख्य रस्ता चकाचक होऊन साइडपट्टीला स्वच्छतेने वेगळाच लूक …

Read More »

सिमेंट बंधारा शेतकर्यांसाठी वरदान

कर्जत तालुक्यातील शेतकरी सुखावले; ओहोळाच्या पाणीसाठ्यात वाढ कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आरडे गावाच्या मागील बाजूने डोंगरातून पाणी वाहून नेणार्‍या ओहोळाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने केला, मात्र त्या नाल्यावर बांधलेला सिमेंट बंधारा स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून अनेक कारणांनी हा सिमेंट बंधारा मदतीला आला आहे. कर्जत …

Read More »

रायगडात अजित पवारांचा शब्द मोडला गेला

पालकमंत्री पदावरून शिवसेनेच्या प्रकाश देसाईंची नाराजी पाली : प्रतिनिधीराज्यात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील तेथे त्याच पक्षाचा पालकमंत्री होणार, असे भाष्य केले होते. त्यामुळे तीन आमदार निवडून आलेल्या …

Read More »

खालापूरजवळ कार अपघातात अभिनेत्री शबाना आझमी जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर हद्दीत प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला अपघात होऊन त्या व त्यांचा कारचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 18) दुपारी 4च्या सुमारास झाला. पोलीस व अन्य यंत्रणांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी मुंबई-पुणे एक्स्प्रेस …

Read More »

नरवीर तान्हाजी मालुसरे समाधीस्थळ नूतीनकरणाच्या कामाला वेगात सुरुवात

अलिबाग, पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे गाव नरवीर तान्हाजी मालुसरे यांची कर्मभूमी आहे. या गावात तानाजी मालुसरे व शेलारमामा यांच्या समाधी आहेत. यंदा तान्हाजी मालुसरे यांची 350वी पुण्यतिथी 17 फेब्रुवारीला आहे. त्यानिमित्त नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरण केले जात आहे.  मोठ्या संख्येने पर्यटक या गावाला …

Read More »

वीजचोरांवर गुन्हे दाखल; कर्जत तालुक्यात महावितरणची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी महावितरणने वीजचोरीप्रकरणी कर्जत तालुक्यामध्ये धडक मोहीम राबविली असून, तालुक्यातील पाच वीजचोरट्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महावितरणचे कर्जत येथील उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचार्‍यांनी वीजचोरीप्रकरणी  धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत चंद्रकांत खंडू ठाकरे (रा. तिवरे), जगदिश अण्णा पवार (रा. सापले), …

Read More »

जंजिरा किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी नौदल, तटरक्षक दल आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा किल्ल्यात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक भेट देतात. हे पर्यटक सोबत प्लास्टिक पाणी बॉटल, प्लास्टिक डबे अथवा अन्य सामुग्री आणतात. आपला कार्यभार उरकताच ते …

Read More »

कडावमध्ये सांडपाणी रस्त्यावर; सततच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण

कडाव : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील कडावमधून  पोटलपालीकडे जाणार्‍या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कडावमधील शिवतेज हॉटेलजवळ पोटलपाली, जांभिवलीकडे जाणारा रस्ता आहे. या परिसरात अनेक छोटीमोठी दुकाने आणि एक रिक्षा स्टँड आहे. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला …

Read More »

वंजारपाड्यात आठवड्यातून एकदा पाणी; नळ योजना कुचकामी; विहिरीवर उसळतेय महिलांची गर्दी

कर्जत : बातमीदार  तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा आणि शेंडेवाडी येथील नळपाणी योजना अल्पावधीत कुचकामी ठरली आहे. या योजनेतून आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्याने महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी विहिरीवर रात्रीपर्यंत थांबून राहावे लागत आहे. दरम्यान, या योजनेच्या दुरुस्तीचे काम सतत सुरू राहत असल्याने ग्रामस्थांनी या नळपाणी योजनेच्या कामाची चौकशी करण्याची …

Read More »