Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माजी आमदार साटम यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्यवाटप

खोपोली : प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार देवेंद्र साटम यांचा 16 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने खोपोली शहरातील भाजप पदाधिकार्‍यांनी गुरूवारी मुळगांव ठाकूरवाडी येथील नगरपालिका शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप केले. या कार्यक्रमाला स्वतः देवेंद्र साटम, नगरपालिकेचे परिवहन सभापती तुकाराम साबळे, भाजपचे माजी …

Read More »

एसटी बसला ट्रकची धडक, वाकण-पाली मार्गावरील अपघातात 25 प्रवासी जखमी

नागोठणे : प्रतिनिधी पेणहून पालीला जाणार्‍या एसटी बसला गुरूवारी (दि. 16)सकाळी वाकणनजीक समोरून येणार्‍या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह महिला बसवाहक तसेच इतर 22 प्रवासी जखमी झाले. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा  समावेश आहे. यातील काही गंभीर जखमींना अलिबाग तसेच नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेणहून …

Read More »

पेणमध्ये पतंग महोत्सवाची धूम

पेण : प्रतिनिधी पतंग महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण येथे केले. महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात नगराध्यक्षा पाटील बोलत होत्या. स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळी केल्यामुळे आज …

Read More »

रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात

रेवदंडा : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा 19 वा वर्धापनदिन नुकताच  रेवदंड्यातील काशिनाथ बनिया विरगुंळा उद्यानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष सुभाष चिटणीस यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य व स्मार्ट कार्डची माहिती दिली. रेवदंडा अर्बन बँकेचे चेअरमन वामन घरत यांनी बँकेतर्फे ज्येष्ठांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. आदर्श …

Read More »

चिकनपाडा रस्त्याकडे जि. प.चे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाली होती, त्यात चिकनपाडा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेथील रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता आणि त्यासोबत रस्त्याला असलेल्या संरक्षक भिंतीही कोसळलेल्या होत्या. त्या सर्व कामांची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची होती, मात्र गेल्या तीन महिन्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची …

Read More »

रायगडात महाविकास आघाडीत बिघाडी

जि. प.च्या सत्तेत सहभागी न होण्याचा शिवसेनेचा निर्णय अलिबाग : प्रतिनिधीराज्यात मोठा गाजावाजा करून तयार झालेल्या आणि राज्य सरकार स्थापन करणार्‍या महाविकास आघाडीचे रायगड जिल्ह्यात मात्र तीनतेरा वाजले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बुधवारी (दि. 15) बिनविरोध झाली, मात्र शिवसेना सदस्यांनी या सभेस गैरहजर राहून आपली नाराजी …

Read More »

बहुजन क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करा -उदय काठे

रेवदंडा : प्रतिनिधी बहुजन क्रांती मोर्चातर्फे 8 जानेवारी रोजी अलिबागमध्ये मोर्चा काढला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी  पंचायत समिती सदस्य व रायगड जिल्हा भाजप चिटणीस उदय काठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल …

Read More »

अलिबागमध्ये अभिनव अभिवाचन स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी अभिवाचन आनंद आणि आभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पीएनपी नाट्यगृहात एकल व सांघिक अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वयाच्या 13 वर्षापासून ते अगदी 65 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांच्या अभिवाचनामुळे अलिबागकरांना  अभिवाचन मेजवानीचा आस्वाद घेता आला. या अभिवाचन स्पर्धेची संकल्पना श्रद्धा पोखरणकर यांची होती. अलिबाग तालुका तसेच पुणे …

Read More »

नेरळ रेल्वे फाटकातील रस्त्यामधील लोखंडी सळया बाहेर

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशनच्या कर्जत बाजूकडे असलेल्या फाटकामधील  डांबरी रस्त्यामधून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. त्या सळया फाटकातून रूळ ओलांडणार्‍या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चाकात घुसत असून त्या गाड्यांचे टायर निकामी ठरत असल्याचे सातत्याने घडत आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत सातत्याने आवाज उठवूनदेखील त्या …

Read More »

वाहनधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका पेण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीसदल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात बुधवारी (दि. 15) 31वा रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाहन चालविताना होणार्‍या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन धारकांनी नियमांचे …

Read More »