Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगड किल्ला रोप वे कंपनीला जिल्हाधिकार्‍यांची नोटीस

अलिबाग : प्रतिनिधीरायगड किल्ल्यावरील रोप वेच्या संचालक कंपनीला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नोटीस बजावली आहे. पुरातत्व विभाग आणि संबधित यंत्रणांच्या परवानगीशिवाय रोप वे प्रकल्पाच्या क्षमतावृद्धीचे काम सुरू केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड किल्ला प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘रमाधाम’ला भेट

शिवसेना नगरसेविका, कार्यकर्त्यांसह प्रसारमाध्यमांना पोलिसांनी रोखले खोपोली : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 28) खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमास भेट दिली. हा त्यांचा खासगी दौरा असल्याचे सांगत या वेळी पोलिसांनी प्रसारमाध्यमांना ‘रमाधाम’च्या प्रवेशद्वारावर रोखल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनाही मज्जाव केला. रमाधाम वृद्धाश्रमातील …

Read More »

बनावट नोटा छापणारी दुकल अटकेत; अलिबागमध्ये कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी बनावट नोटा छापणार्‍या दोन जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख 14 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा, तसेच स्कॅनर प्रिंटर जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना अलिबाग शहरातील मेघा टॉकिज परिसरात काही इसम …

Read More »

‘मेहबूब’च्या विद्यार्थ्यांना दिले साहसाचे धडे

मुरूड : प्रतिनिधी विहूर येथील मेहबूब हायस्कूलतर्फे नुकतेच नवाबकालीन गारंबी धरण परिसरात साहसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. हे शिबिर विद्यार्थ्यांना भावी जीवनात खूप मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास महेश पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. राष्ट्रगीताने या शिबिराची सुरुवात झाली. या एकदिवसीय शिबिरात …

Read More »

फोरेट विष खाल्ल्याने पाच गायी मृत्युमुखी

रेवदंडा : प्रतिनिधी बाहेर चरण्यासाठी सोडलेल्या तिन गायी व दोन खोंड यांनी फोरेट विष खाल्ल्याने मृत्यमूखी पडल्याची घटना कोर्लई येथील शेतात घडली, याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जाणीवपुर्वक विष घातल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. कोर्लई येथे शनिवारी (दि. 28) सकाळी सहा …

Read More »

पोलादपूरमध्ये अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधीपोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर रानबाजिरे येथे खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वार दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसटी बसखाली दुचाकी येऊन गुरुवारी (दि. 27) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.अरुण अशोक गोळे (रा. चांभारगणी, ता. पोलादपूर) आणि संदीप नाना ढेबे (रा. तुटवली, ता. पोलादपूर) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. त्यांची दुचाकी …

Read More »

कार्यशाळेस पत्रकारांचा प्रतिसाद

अलिबाग : जिमाका माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मुंबई येथील पत्र सूचना कार्यालयांच्या वतीने पेण येथील सौभाग्य इन इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नुकताच पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा  घेण्यात आली. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. या वेळी पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले, प्रेस क्लबचे नवी मुंबई अध्यक्ष मनोज जालनावाला, रायगड अध्यक्ष अनिल भोळे, मराठी …

Read More »

चिकणी आदिवासीवाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात

नागोठणे : प्रतिनिधी जिल्हा नियोजन अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास निधीतून राष्ट्रीय महामार्ग 66 ते चिकणी आदिवासीवाडी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने काम करता येऊ शकले नव्हते. आता या कामाला 25 …

Read More »

सरकारी गुरचरण जागेत उत्खनन, कर्जत बामणोली वाडीतील आदिवासींकडून कारवाईची मागणी

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील किरवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बामणोली येथील शासकीय गुरचरण जागेत मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन एका धनिकाच्या खाजगी जागेवर मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे तेथील आदिवासी बांधवांची स्मशानभूमी उध्वस्त झाली असल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. मुंबईतील  अब्दुल वाहित अब्दुल अजीज खान, रियाज …

Read More »

आमच्या जमिनी परत करा!, खारेपाटातील शेतकर्यांचे लाक्षणिक उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्याच्या खारेपाट परिसरातील जमिनी खाजगी प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर मागील अनेक वर्षांपासून या प्रकल्पांची वीटही उभी राहिली नाही. त्यामुळे या जमिनी आम्हाला परत करा, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. श्री शिवछत्रपती …

Read More »