मुरूड : प्रतिनिधी शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचार्यांना शासनाकडून पगार दिला जातो. त्यामुळे जनतेची कामे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, मात्र ते काम पूर्ण करण्यासाठी ते अतिरिक्त रक्कम स्वीकारत असतात. अशा पद्धतीला आळा बसण्यासाठी लाचलुचपत विभागाची उभारणी करण्यात आली असून, लोकांनी या विभागाकडे तक्रार नोंदवावी व लाच पद्धतीला कायमस्वरूपी प्रतिबंध …
Read More »वाळीत विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, उंबरगावमधील घटनेने खळबळ
पाली : प्रतिनिधी गावाने वाळीत टाकलेल्या निवृत्त पोलीस कर्मचार्याच्या विवाहित मुलीने विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्यावर योग्य वेळी उपचार झाल्याने या तीन मुलांच्या आईचा जीव वाचला आहे. पिंकी संदीप मांगे (वय 29, रा. उंबरगाव, ता. सुधागड) असे या विवाहितेचेे नाव आहे. नागोठणे पोलीस ठाण्यातून निवृत्त झाल्यानंतर …
Read More »खंडाळा घाटातील दुरुस्तीसाठी अनेक मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द, रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल
कर्जत : बातमीदार मुंबई-पुणे या मेन लाईनवरील खंडाळा घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्या कामामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचे मेगा हाल सुरू आहेत. रेल्वेने अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने प्रवासी संघटना आंदोलनाच्या …
Read More »‘मतदारसंघाचा विकास हाच ध्यास’
उरण : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता. उरण मतदारसंघाचा विकास करणे हा एकमेव ध्यास असल्याचा विश्वास उरण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. उरण विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी करून निवडून …
Read More »खालापुरात अवैध बारवर छापा; दीड लाखाची दारू जप्त, दोघांना अटक
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील कलोते धरणाच्या परिसरात असणार्या आलिशान बंगल्यावर धाड टाकून उत्पादन शुल्क विभागाने तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा देशी व इलायती बनवाटीचा अवैध दारू साठा जप्त केला असून, दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. खालापुरातील कलोते धरणाजवळ असलेल्या कॅम्प मॅक्स या अलिशान बंगल्यात अवैधरीत्या मेनू कार्ड छापून वाईन, व्हिस्की, …
Read More »खंडाळा घटात बस अपघातात पाच ठार
मुंबई-पुणे महामार्गावरील दुर्घटनेत 24 जखमी, 13 गंभीर खालापूर, खापोली ः प्रतिनिधी पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फूट दरीत कोसळली. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील 13 प्रवासी गंभीर आहेत. त्यांना …
Read More »पालकमंत्र्यांनी शेतकर्यांशी साधला संवाद
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मौजे खंडाळा, रामराज, पेण तालुक्यातील वाशी खारेपाट व हमरापूर विभाग, पनवेल तालुक्यातील तारा या गावातील अतीवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भात पिकाच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शेतकर्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत अलिबागचे आमदार महेंद्र …
Read More »गोवंश हत्येप्रकरणी खालापुरात एकाला अटक
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील हाळ बुद्रुक गावातील रियाज अब्दुल कादीर जळगावकर याला पोलिसांनी गोवंश हत्येप्रकरणी अटक केली आहे. हाळ बुद्रुक गावात बेकायदा गुरांची कत्तल होत असल्याची माहिती खालापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हाळ बुद्रुक गावात छापा टाकला असता रियाज हा गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या …
Read More »शेतकर्यांना शंभर टक्के भरपाई द्या
आमदार महेंद्र थोरवे यांची सूचना; नुकसानीची केली पाहणी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील भातशेती आणि अन्य प्रकारच्या शेतीचे झालेले नुकसान यांची नोंद शासनाने करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना 100 टक्के भरपाई दिली पाहिजे, अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. तालुक्यातील मांडवणे, आंबोट भागातील नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केल्यानंतर तसे आदेश …
Read More »निवृत्त पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना टाकले वाळीत
जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष नागोठणे : प्रतिनिधी माझ्या कुटुंबाला ग्रामस्थ उंबरवाडी पंच कमिटी यांनी वाळीत टाकले असून, त्याची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी हशा नामा हंबीर यांनी रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली असून त्याची प्रत रोहे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पाली पोलीस ठाणे यांना पाठवली …
Read More »