Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बोर्ली येथे कामगार प्रशिक्षण शिबिर

रेवदंडा : प्रतिनिधी दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड,  प्रादेशिक संचलनालय -मुंबई आणि सोमजाई माता संस्था -म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील प्राथमिक शाळेत नुकतेच असंघटीत (मासेमारी) कामगार प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यात कामगार शिक्षण अधिकारी रमेश मढवी यांनी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय शिबिरात आरोग्य, …

Read More »

स्वस्तातली गाडी पडली महागात; व्यावसायिकास सहा लाखांचा गंडा

महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रात रसायनाचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाला कमी दराने निसान कंपनीची किक गाडी देतो असे सांगून त्याला उत्तर प्रदेशातील दोघांनी सहा लाख रुपयांना गंडा घातला आहे. महाड एमआयडीसीमध्ये 15 मार्च ते 24 जून 2019 या कालावधीत ही घटना घडली. रसायन व्यावसायिक सुहास राणे यांनी याबाबत महाड एमआयडीसी …

Read More »

दाखणे ग्रामपंचायत पोटनिवडणूक ; शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी; राष्ट्रवादीला धक्का

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दाखणे ग्रुपग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 3 मधील   पोटनिवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सिताराम महिपत उभारे विजयी झाले असून, या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पुरस्कृत पद्माकर सखाराम उभारे यांचा 62 मतांनी पराभव केला. दाखणे ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. मात्र गतवर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी …

Read More »

नागोठण्यातील मुख्य रस्त्याची दुर्दशा

नागोठणे : प्रतिनिधी येथील एसटी बसस्थानकासमोरील कमानीतून जोगेश्वरी मंदिर, ब्राम्हण आळीकडे जाणार्‍या रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झाला असल्याने ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून धडपडतच मार्गक्रमण करावे लागते. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना विचारले असता, रस्ता तयार करून चार वर्षे लोटली असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली …

Read More »

मुस्लीम बांधवांचा भाजपत प्रवेश

मुरुड : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाबद्दल अल्पसंख्याक समाजामध्ये असलेले गैरसमज दूर केले जातील. सबका साथ सबका विकास याचबरोबर सबका विश्वाससुद्धा संपादन केला जाणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी मुरुड येथे केले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष महेश मानकर यांच्या प्रयत्नाने मुरुड शहर व ग्रामिण भागातील अनेक …

Read More »

रावे सरपंचपदी संध्या पाटील यांचा दणदणीत विजय

भाजपचा झेंडा फडकला; माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा करिष्मा पेण : प्रतिनिधी :  तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या रावे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचपदी भाजप शिवसेना युतीच्या संध्या नाषिकेत पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या रेखा जनार्दन पाटील यांचा 800 मतांनी पराभव केला. रावे …

Read More »

आठ ग्रामपंचायतींसाठी रायगडात शांततेत मतदान

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. रात्री उशिरापर्यंत मतदानाची सरासरी घेण्याचे काम सुरु होते. प्रत्यक्षात सर्व ग्रामपंचायतींचे मतदान सरासरी 90 टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदानाचा …

Read More »

गर्दुल्ले आणि मद्यपींचा मुक्काम

भिवपुरी रोड रेल्वेस्थानकातील नवीन पादचारी पुलाचा घेतला ताबा कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात कर्जत एन्डकडे पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या पादचारी पुलाची कामे अर्धवट असल्याने प्रवासी पुलाचा वापर करीत नाही. त्यामुळे या पुलाचा ताबा गर्दुल्ले आणि दारुडे यांनी घेतला असून तेथे त्यांचा मुक्काम …

Read More »

‘नेरळ-माथेरान स्थानकांचा कायापालट करणार’

कर्जत ः बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेसेवा चांगली व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. त्याचवेळी नेरळ आणि माथेरान ही दोन्ही स्थानके लोणावळा स्थानकाप्रमाणे पर्यटन रेल्वे स्थानके जाहीर केली आहेत. या स्थानकांचा कायापालट पुढील काळात पूर्ण होईल, असा आशावाद खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, लोकांची पाच वर्षे सेवा केली …

Read More »

ईटीसी कंपनीत वृक्षारोपण

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डाळ उत्पादन करणार्‍या ईटीसी कंपनीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी वावोशी विभागाचे मंडळ अधिकारी संदीप जाधव, सरपंच शैलेश मोरे, तलाठी तसेच कंपनीचे व्यवस्थापक राकेश पांडे, सुनील लोखंडे, ग्रामसेवक बी. पी. पाटील आदी उपस्थित …

Read More »