Breaking News

Ankit Shah

वृक्ष लागवडीसाठी असंख्य लोक सरसावले

मुरुड तालुका हा जंजिरा संस्थांच्या अधिपत्याखाली असणारा तालुका आहे.श्रीवर्धन म्हसळा व मुरुड हे तीन तालुके सर सिद्धी अहमद खान यांच्या ताब्यात असून त्यांचे राहण्याचे ठिकाण हे मुरुड असल्याने याच ठिकाणी नवाबांचा राजवाडा आहे. जंजिर्‍याचे नवाब म्हणून त्यांची खाती संपूर्ण जगाला होती.मुरुड तालुक्याला तसे पहाता वृक्ष लागवडीचे वेड हे नवाबाच्या काळातच …

Read More »

राजीनाम्यानंतर पुढे काय?

गांधी घराण्याशी असलेली आपली निष्ठा दर्शवण्याची ही संधी सच्चे काँग्रेस नेते चुकवणार नाहीत. तर हे सारे नाट्य एकीकडे पार पडल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊन कदाचित काँग्रेस अध्यक्ष पदी नव्या व्यक्तीची निवड होईलही. पण हा नवा अध्यक्ष काहीही झाले तरी नामधारीच असणार, हे उघड गुपित आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी …

Read More »

‘वंचित’मध्ये उभी फूट?

लक्ष्मण मानेंचे आंबेडकरांवर शरसंधान मुंबई ः प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधणार्‍या आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र स्थान निर्माण करू पाहणार्‍या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. आघाडीत आता अन्य लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा राहिलेली नाही, …

Read More »

एटीएममध्ये स्कीमर, छुपा कॅमेरा

पनवेल : बातमीदार  – एटीएमद्वारे रोख रक्कम काढण्यासाठी येणार्‍या नागरिकांची माहिती चोरण्याच्या उद्देशाने दोघा नायजेरियन नागरिकांनी तळोजा पाचनंद येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या एटीएममध्ये कार्ड रिडरवर स्कीमर डिवाइस व एटीएम कीबोर्डच्या वरील बाजूस कॅमेरा डिवाइस लावल्याचे उघडकीस आले आहे. या एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीवरून हा प्रकार उघडकीस आला असून तळोजा …

Read More »

खाजगी बसेसमुळे रहदारीला अडथळा

सबंधितांवर कारवाईची तेजस कांडपिळे यांची मागणी पनवेल : प्रतिनिधी  – पनवेल रेल्वेस्थानक ते तक्का या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाजगी बसेस उभ्या राहत आहेत. यामुळे वाहतूक व रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर …

Read More »

सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई

उरण ः रामप्रहर वृत्त – छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रसार व प्रचार करणार्‍या सह्याद्रि प्रतिष्ठान उरण तालुक्याच्या वतीने उरण तालुक्यातील उरणचे वैभव असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहिमेअंतर्गत साफसफाई करून विविध वृक्षे लावण्यात आली. सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात चालू …

Read More »

मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये स्वरांश कोळी आठवा

बेलापूर ः प्रतिनिधी – 2018-19 मध्ये पार पडलेल्या मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमधये सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राज्यभरातून सहभाग घेतला होता. त्यात स्वरांश सागर कोळी याने आठव्य क्रमांकार झेप घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या बुध्दी व कौशल्याचा ठसा उमटविल्याने भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये त्याचे कौतुक होत आहे. स्वरांग कोळी याने शालेय स्तरावरील परीक्षा …

Read More »

उरणमधील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा

जसखार, रांजणपाडा, मुळेखंड, सोनारी, करळ गावात घुसले पाणी उरण ः वार्ताहर – गेल्या सहा दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाचा जोर वाढत असून पावसाने आता रौद्ररूप धारण केले आहे. उरणमध्ये गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. उरण तालुक्यात नव्याने येत असलेल्या प्रकल्पांच्या …

Read More »

मालाडच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल -मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी  – मुंबईतील मालाड इथं संरक्षक भिंत कोसळून 18 जण ठार, तर 75 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची उच्चरस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 2) विधानसभेत बोलताना केली. दोन दिवसांच्या पावसात तुंबलेल्या मुंबईवर विरोधकांनी आज विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. त्याला …

Read More »

मच्छीमारांच्या समस्या मार्गी लावण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश

उरण ः रामप्रहर वृत्त  – जेएनपीटी चौथे बंदरबाधित ओएनजीसी पाईप लाईन प्रकल्पबाधीत मच्छीमारांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मच्छीमारांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जेएनपीटी चौथे बंदर व ओएनजीसीची पाईप लाईन प्रकल्पबाधित मच्छीमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत …

Read More »