खोपोली : प्रतिनिधी हवामान खात्याने रायगडला अतिवृष्टीबाबत ऑरेंज इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खालापूरचे तहसीलदार चप्पलवार यांनी धोकादायक दरडप्रवण वाटणार्या बीड खुर्द आदिवासीवाडी आणि बौद्धवाडा या ठिकाणी रविवारी (दि. 29) भेट देत ग्रामस्थांना उपयुक्त सूचना केल्या. रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज इशारा देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील तीन …
Read More »माणगाव एसटी बसस्थानकाची दैनावस्था
प्रवाशांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष माणगाव : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या माणगाव बसस्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे. बसस्थानकाच्या आवारात मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत चालक या स्थानकात बस घेऊन येतात, तसेच प्रवासीदेखील चिखलातून मार्ग काढीत बस स्थानक गाठतात, मात्र त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत …
Read More »लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचा 26 वर्षांचा प्रवास
किरण ठाकूर यांनी समविचारी, समर्पित आणि विकासाभिमुख सहकार्यांसमवेत 1995 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीची स्थापना केली. 31 ऑगस्ट 1995 रोजी एकाच शाखेपासून सुरू झालेल्या लोकमान्य सोसायटीचा गेल्या 26 वर्षांत विस्तार झपाट्याने वाढला आहे. आज कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि दिल्ली येथे 213+ पेक्षा जास्त शाखा आहेत, ज्यात 5500 कोटीपेक्षा …
Read More »गोविंदा रे… गोपाळा!
श्रावण महिना आला की गोविंदा आला रे आला या गाण्याने अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वांचा आवडता सण-उत्सव म्हणजेच गोपाळकाला. गोपाळकाला हा श्रीकृष्ण जयंतीच्या दुसर्या दिवशी साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. या दिवशी ठीकठिकाणी दहीहंडी टांगली जाते आणि बालगोपाळांची गोविंदा मंडळे त्या ठिकाणी जाऊन मनोरे लावून दहीहंडी फोडतात आणि …
Read More »बहिर्यांसाठी शंखनाद
देवस्थाने लवकरात लवकर उघडावीत ही मागणी भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून सातत्याने लावून धरली आहे. तरीदेखील महाविकास आघाडीचे सरकार डोळे आणि कान मिटून स्वस्थ बसून आहे. सरकारच्या बहिर्या कानांवर देवस्थानांच्या मागण्या जरा मोठ्या आवाजात पडाव्यात या हेतूने भाजपतर्फे सोमवारी शंखनाद आंदोलन करण्यात आले. या उत्स्फूर्त आक्रोशाचा सूर कानावर पडल्यानंतर तरी सरकारचे …
Read More »पनवेलच्या पाडा मोहल्ल्यात साफसफाई
नगसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील पाडा मोहल्ल्यात बरेच दिवस झाले साफसफाई व्यवस्थित होत नव्हती. त्याबद्दल तेथील नागरिकांनी ही समस्या नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी त्वरित महानगरपालिका अधिकार्यांशी संपर्क साधून पाडा मोहल्यात सफाई करून घेण्यास सांगितले. महानगरपालिका सफाई विभागाने तक्रारीची दखल घेत पाडा मोहल्यात साफसफाई …
Read More »मन की बातचे कार्यक्रमाचे पनवेलमध्ये थेट प्रक्षेपण
पनवेल : रामप्रहर वृत्त सबका साथ, सबका विकास यासोबत सबका प्रयास या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात द्वारे देशवासीयांशी संवाद साधता वेळी केला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात द्वारे देशवसीयांशी संवाद साधतात. …
Read More »देशात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी (दि. 29) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 45,083 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 460 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 35,480 जण कोरोनातून बरेही झाले आहेत. देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची …
Read More »एसटी कर्मचार्यांची दुर्दशा
महाडममध्ये ना पगार, ना मदत; ठाकरे सरकारवर कामगार नाराज महाड : प्रतिनिधी महाडमध्ये पूर आला आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्थ झाले. घरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, मात्र पूरग्रस्त एसटी कामगारांना गेली दोन महिने पगार, पूरग्रस्त म्हणून मदत मिळालेली नाही. महामंडळाच्या या भूमिकेवर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण कोकणात …
Read More »स्नेहदिप फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी स्नेहदिप फाऊंडेशन आणि अंजुमन नजमी दाऊदी बोहरा जमात पनवेलतर्फे रविवारी (दि. 29) बोहरी समाजाच्या हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिबिराला भेट दिली. या वेळी ते म्हणाले की, रक्तदान हे पवित्र दान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper