Breaking News

Ramprahar Team

कोरोनामुळे इतर रोगांच्या रुग्णांत घट

पनवेल : वार्ताहर दरवर्षी उन्हाळ्यात उदभवणार्‍या आजारांच्या तुलनेत यावर्षी लक्षणीय घट झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असले तरी दरवर्षीच्या तुलनेत इतर आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून लॉकडाऊन तसेच वर्क फ्रॉम होममुळे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग घरूनच ऑनलाइन काम करीत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यासदेखील …

Read More »

कोरोना चाचणीमुळे मोकाट फिरणारे धास्तावले

कळंबोलीत 38 नागरिकांची ‘आरटी-पीसीआर’ पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात विनाकारण फिरणार्‍यांसाठी पोलीस आणि पालिकेच्या माध्यमातून अनोखी कारवाई सध्या सुरू करण्यात आली आहे. मोकाट फिरणार्‍या नागरिकांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास त्यांची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे. या कारवाईमुळे विनाकारण फिरणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. काही लोकांना कोरोनाची लक्षणे असून …

Read More »

‘आज प्रकल्पग्रस्त ताठ मानेने जगतोय केवळ ‘दिबां’मुळेच’

पनवेल : वार्ताहर सिडको आस्थापनाने अधिग्रहित केलेल्या 95 गावांतील प्रकल्पग्रस्त बांधव आज जर ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल, ताठ मानेने जगत असेल तर त्याचे परिपूर्ण श्रेय प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचेच आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव त्यांचेच दिले पाहिजे, अशी भूमिका मराठा …

Read More »

चक्रीवादळात कामोठ्यातील मच्छी मार्केट उद्ध्वस्त

विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न; नुकसानभरपाई मिळण्याची मागणी पनवेल : वार्ताहर तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. पनवेल शहरालादेखील सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील झाडे कोलमडून पडली तर होर्डिंग्जदेखील तुटून रस्त्यावर पडले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पनवेल परिसरातील नवीन वसाहत असलेल्या कामोठे येथील सेक्टर …

Read More »

कोरोना संकटात नैसर्गिक आपत्ती

महाराष्ट्रासह संपूर्ण देश सध्या वैश्विक महामारी कोरोनाचा सामना करीत असताना चक्रीवादळरूपी नैसर्गिक आपत्तीने अरबी समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांच्या त्रासात अधिकच भर घातली आहे. केरळपासून घोंघावलेल्या आणि गुजरातपर्यंत धडकलेल्या या वादळाने जीवित आणि वित्तहानी घडवून आणली. त्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात थैमान घातले आहे. कोरोनाबाधित होणार्‍यांचा आकडा सध्या …

Read More »

पनवेलमध्ये आजपासून ‘ड्राइव्ह इन लसीकरण’

महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पनवेल मनपाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याअनुषंगाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध कोविड लसीकरण केंद्रावरती 45 वर्षांवरील दिव्यांग …

Read More »

वावळोली कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून ’एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधे भेट देण्यात आली. तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने निधी गोळा केला आणि त्यातून वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधांची भेट दिली. तहसीलदार दिलीप …

Read More »

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रास संपूर्ण किटसह ऑक्सिजन सिलेंडर भेट

कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थानचा मदतीचा हात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात सामाजिक बांधिलकी जपत  येथील बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला संपूर्ण किटसह तीन ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले आहेत. कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा …

Read More »

पालीतील जनता कर्फ्युला प्रतिसाद

औषधांची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालीमध्ये शनिवारपासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत रविवारी (दि. 16) दुसर्‍या दिवशीही औषधांची दुकाने सोडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. करोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पालीमध्ये शनिवार (दि. 15) पासून …

Read More »

एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, वाहनचालक बचावला

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झीटजवळ   चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो रविवारी (दि. 16) सकाळी महामार्गाच्या रेलिंगला जाऊन धडकला आणि पलटी झाला. या अपघातात वाहनचालक सुदैवाने बचावला. अद्रकने भरलेला टेम्पो एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईला जात होता. खोपोली एक्झीटजवळ रविवारी सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो एक्सप्रेस वेच्याबाजूच्या रेलिंगला …

Read More »