Breaking News

Ramprahar Team

परीक्षेचा हव्यास

गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती, तेव्हा 60 वर्षे वयाच्या वरील व मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांना प्रचंड त्रासास तोंड द्यावे लागले होते. सध्या आलेल्या दुसर्‍या लाटेत मात्र लहान मुले, शाळकरी विद्यार्थी व तरुण वर्ग भरडला जात आहे असे दिसून येते. ही अतिशय गंभीर बाब असून गेल्या …

Read More »

शेतकर्यांच्या दबावापुढे राज्य सरकार नमले

‘फार्मा पार्क’साठी सक्तीचे भूसंपादन करणार नसल्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन अलिबाग : प्रतिनिधी रोहा तालुक्यात फार्मा पार्क प्रकल्प उभारण्याचा घाट राज्य शासनाने घातला होता, मात्र त्यास बाधित शेतकर्‍यांनी कडाडून विरोध केला. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी मोर्चे काढले, आंदोलने केली. यानंतर आता रोहा तालुक्यातील फार्मा पार्कबाधित शेतकर्‍यांच्या …

Read More »

अलिबाग किहीम येथे उभारणार डॉ. सलीम अली अभ्यास व संशोधन केंद्र

अलिबाग : प्रतिनिधी बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखल्या जाणार्‍या पद्मविभुषण सलीम अली यांचे अभ्यास व संशोधन केंद्र अलिबाग तालुक्यातील किहीम येथे उभारण्यात येणार आहे. किहीम येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत या संशोधन केंद्रासाठी हस्तांतरीत केली जाणार आहे. डॉ. सलीम अली हे अलिबाग तालुक्यातील धोकवडे आवास परिसरात बराच काळ …

Read More »

रिक्षा-कार धडक अपघात प्रकरणी नेरळ पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

कर्जत : बातमीदार तालुक्यातील डिकसळ गावाजवळ सोमवारी रिक्षा आणि कार यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी नेरळ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून, कारबद्दल अधिक चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. आयन टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीची  हुंडाई एक्ससेंट कार (एमएच-01,सीजे -2948) सोमवारी रिक्षावर जाऊन धडकली होती. त्यानंतर रिक्षाने पेट घेतला आणि तिघांचा …

Read More »

खोपोली पालिकेचे चिंचवली प्रभागाकडे दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील लव्हेज, चिंचवली प्रभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लव्हेजमध्ये रेल्वे स्टेशन असून, तेथे आजूबाजूच्या अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि कामगार रेल्वेने प्रवास करण्यासाठी येत-जात असतात. येथील रस्तेच खड्ड्यात गेल्याने …

Read More »

पोलादपूरजवळ कंटेनर कलंडला; चालक जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये असलेल्या धामणदिवी (ता. पोलादपूर) गावालगत गुरूवारी (दि. 1)पहाटेच्या सुमारास एक कंटेनर कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, कशेडी टॅप वाहतूक पोलिसांनी तातडीने एकेरी वाहतूक सुरू केल्याने महामार्गावरील वर्दळ सुरळीत राहिली. चालक मोहम्मद अहमद सिद्दिकी (वय 26, मुळ रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश, …

Read More »

नागोठण्यात विनामास्क फिरणार्यांवर कारवाईचा बडगा

नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाशी आमचे काही देणेघेणे लागत नाही अशा अविर्भावात शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच बाजारपेठ भागात मास्क न लावता फिरणार्‍या व्यक्तींवर ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी (दि. 31) दंडात्मक कारवाई केली. ग्रामपंचायत तसेच पोलीस यांनी उघडलेल्या या मोहिमेमुळे शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. …

Read More »

चक्क रस्ता गेला चोरीला!

करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा मार्गाची नोंदच नाही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा ग्रामस्थांचा इशारा खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा हा रस्ता चोरीला गेला असून तो शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीत करंबेली ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा ही गावे असून …

Read More »

पालीत मास्क न घालणार्यांवर कारवाई

एका दिवसात 22 जणांकडून 3200 रुपयांचा दंड वसूल पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली शहरात मास्क न लावणार्‍या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासक दिलीप रायन्नावार यांच्या आदेशाने बुधवार (दि. 31) दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात 22 व्यक्तींकडून तीन हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे मास्क न लावणार्‍यांचे धाबे …

Read More »

तीन जणांचे बळी घेणार्या स्पॉटवर गतिरोधक

पोलीस प्रशासनाचा पुढाकार कर्जत : बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्गावर सोमवारी झालेल्या  अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या राज्यमार्गावरील अपघात प्रवण क्षेेत्रात गतिरोधक उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर सोमवारी (दि. 29) भरधाव वेगाने आलेल्या हुंडाई एक्ससेंट कारने रिक्षेला धडक दिली …

Read More »