Breaking News

Ramprahar Team

भारीट पक्ष्यांचा कोकणातील मुक्काम वाढला

पाली ः प्रतिनिधी हिवाळ्यात पूर्व युरोप व पूर्व इराण देशांतून जवळपास 7000 किमीचा प्रवास करून काळ्या डोक्याचे भारीट पक्षी कोकणात येतात आणि हिवाळा संपला की आपल्या मूळ ठिकाणाकडे हळूहळू परततात, मात्र उन्हाळा सुरू झाला तरीही हे पक्षी थव्याने जिल्ह्यातील विविध ठिकाणी वावरताना पक्षी अभ्यासकांना दिसत आहेत. मुबलक खाद्य व पोषक …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघातांमध्ये दोघे जखमी

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी  मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री (दि. 21) मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात घडले. पहिल्या अपघातात टँकरचालक पुण्याहून मुंबईकडे जात असताना टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर महामार्गावर पलटी झाला. ही घटना खोपोली एक्झिटजवळ रात्री 9.30च्या सुमारास घडली. सुदैवाने अपघातात वाहनचालक बचावला. कंटेनर महामार्गावर पलटी झाल्यामुळे मोठ्या …

Read More »

श्रमिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

कर्जत ः बातमीदार नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेरळमधील श्रमिक आणि कामगार क्षेत्रात कार्यरत 15 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ भाजपच्या वतीने श्रमिक आणि कामगार वर्गातील 15 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथील जेनी ट्युलिप शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमाला भारतीय …

Read More »

महाराष्ट्रात प्रथमच होणार गिधाडांची गणना

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नैसर्गिक पद्धतीने गिधाड संवर्धनाचा प्रकल्प राबविणारे रायगड जिल्ह्यातील पक्षीशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांच्या सिस्केप संस्थेमार्फत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या गिधाड संवर्धन व संशोधन प्रकल्पांतर्गत 21 मार्च या जागतिक वनदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, सुधागड (पाली) या तालुक्यांतून गिधाडांची गणना सुरू आहे, मात्र या कार्यात …

Read More »

वर्षपूर्तीचा धडा

आपापले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, राजकारणाचे डावपेच खुंटीला टांगून ज्या-ज्या राज्यांनी केंद्र सरकारच्या साथीने कोरोनाशी मुकाबला केला, त्या राज्यांमध्ये कोरोनाचा विषाणू पुरता नमला आहे. दुर्दैवाने हा धडा महाराष्ट्र शिकलाच नाही, असे म्हणावे लागेल. कारण सार्‍या देशात कोरोना नियंत्रणात असताना महाराष्ट्रात मात्र रुग्णसंख्येचा स्फोट झालेला दिसतो आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उतरणीला लागलेली ही …

Read More »

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; खारघरमधील सेंट्रल पार्क बंद

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामध्ये खारघर नोडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. खारघर येथील सेंट्रल पार्क हे सुमारे 100 एकर परिसरात पसरलेले भव्य असे उद्यान …

Read More »

खंडणीखोर गृहमंत्र्यांचा रोह्यात भाजपकडून निषेध

धाटाव : प्रतिनिधी वरिष्ठ पोलीस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी खंडणीखोर गृहमंत्र्यांचा भाजपच्या वतीने जाही निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली रोह्यामध्ये खंडणीखोर  गृहमंत्री …

Read More »

बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या मी सोबत आहे -आमदार महेश बालदी

उरण : वार्ताहर तुमचा मी सहकारी आहे. हे आंदोलन आम्हाला वेदना देणारे आहे. बेमुदत धरणे आंदोलन जास्त दिवस चालणार नाही. आपण लवकरच संघर्ष संपवू. बेमुदत धरणे आंदोलन पूर्ण तडीस नेण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांना दिले. भेंडखळ येथील बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी …

Read More »

राज्य सरकारचा महाराष्ट्रात तमाशा

चंद्रकांत पाटील यांचा घणाघातल पुणे : प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यभर भाजपने आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. पुणे शहरातही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा …

Read More »

बनावट विदेशी मद्यनिर्मिती केंद्रावर छापा; दोघांना अटक

रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2ने पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील ईमानूल मर्सिहोम आद्रमच्या बाजुला, नदीकाठी असलेले शेतघर येथे छापा घातला. या वेळी रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध …

Read More »