तळोजा : रामप्रहर वृत्त खारघर येथील जय हिंद फाउंडेशनच्या वतीने तळोजा येथील केंद्रीय राखीव पोलीस बल मैदानात पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून पाच किलोमीटर अंतराच्या जयहिंद मॅरेथॉनचे आयोजन रविवारी (दि. 6) करण्यात आले होते. या स्पर्धेत कामोठे येथील रहिवासी दिलीप शेलार यांची सात वर्षांची मुलगी स्वराने सहभागी होत दौड पूर्ण …
Read More »नवी मुंबईत कॅरम स्पर्धेला प्रतिसाद
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिरवणे गाव येथे दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धा झाली. भाजपचे महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत देशाच्या विविध भागातील खेळाडू सहभागी झाले होते. मालदीव येथे झालेल्या …
Read More »रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी उत्साहात
पेण : प्रतिनिधी ट्रॉफी फाईटर्स फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ गट (सिनिअर) व सब ज्युनिअर मुले व मुली यांची जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा नुकतीच पेण प्रायव्हेट हायस्कूल मैदानात उत्साहात झाली. स्पर्धेच्या उदघाटन समारंभास माजी जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार …
Read More »पनवेलमध्ये गुणवंत खेळाडूंचा सत्कार
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त हार्मोनी स्पोर्ट्स क्लब आणि रायगड बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये टर्फ क्रिकेटचे सामने रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. या वेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सुयश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा माजी …
Read More »ताम्हिणी घाट व डोंगरमाथ्यावर धुक्याची दुलई
प्रवासी, पर्यटक सुखावले सुधागड : रामप्रहर वृत्त हिवाळा सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यात थंडी आणि धुके जाणवत आहे. डोंगरावर विशेषतः ताम्हिणी घाटात पांढर्या शुभ्र व करड्या रंगांचे ढग दाटत आहेत. जणू काही येथे स्वर्गच असल्याचा भास होतो. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईने हा अद्भुत नजारा आणखी बहारदार होतो. त्यामुळे येथून प्रवासी, …
Read More »माणगावात जुगार अड्ड्यावर छापा; 39 जणांविरुद्ध गुन्हा
माणगाव : प्रतिनिधी माणगाव शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून 39 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणाहून एक लाख 85 हजार 310 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. माणगाव शहरातील वक्रतुंड हॉटेलमध्ये काही लोक तीन पत्यावर पैसे लावून गैरकायदेशीररित्या जुगार खेळत होते. या ठिकाणी पोलिसांनी शनिवारी …
Read More »बोरघाटात रिक्षा अपघातात दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात खोपोलीनजीक टाटा पॉवरच्या सायमाळ वसाहतीजवळील अवघड वळणावर एक रिक्षा समोरून येणार्या खाजगी बसवर धडकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा येथून किरण वाघमारे याच्या रिक्षेतून (एमएच 14-एचएम 5296) रेल्वेचे कर्मचारी शत्रुंजय त्रिपाठी, राघवेंद्र राठोड, …
Read More »पनवेलमध्ये ‘रोटरी’च्या घनदाट जंगल प्रकल्पाचा शानदार प्रारंभ
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी घनदाट जंगल प्रकल्प उभारून वनीकरणाला चालना देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी (दि. 6) शहरातील लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटलशेजारील नियोजित जागी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर आकर्षित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळंबोलीतील कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. पनवेल शहर व तालुका भाजप …
Read More »तुरमाळे, सांगुर्लीत हर घर जल मिशन योजना
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल मिशन योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे पनवेल तालुक्यात या योजनेकरिता एक कोटी सहा लाख रुपयांचा निधीची मंजूर झाला आहे. यामध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper