पनवेल : रामप्रहर वृत्तयेथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नुकतीच भेट दिली आणि तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची संकल्पना, प्रयत्न व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय साकारले असून, असंख्य रुग्ण तेथे …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यास दिमाखात प्रारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात दोनदिवसीय महाअंतिम सोहळ्यास शुक्रवार (दि. 3) प्रारंभ झाला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या …
Read More »रूचिता लोंढे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप, रिपाइं मित्रपक्ष युतीच्या रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, युतीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 2) दणकेबाज प्रचार केला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली.या प्रचारावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला ब बालकल्याण सभापती कुसुम …
Read More »कर्नाळा बँकेच्या फसवेगिरीला दणका
ठेवीदारांना पैसे परत करण्यासंबंधी निर्देश देण्याचे आरबीआयचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्यासाठी कर्नाळा नागरी सहकारी बँकेला निर्देश देण्याबरोबर या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने दिले आहे. त्यामुळे ठेवीदार संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले असून, कर्नाळा बँकेच्या फसवेगिरी, टोलवाटोलवी आणि …
Read More »नववर्षात पाच विक्रमांवर विराटची नजर
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा कर्णधार विराट कोहली याच्यासाठी 2020 हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. या दशकात विराटने अनेक विक्रम केले आहेत. आता नव्या वर्षातदेखील असेच विक्रम विराट स्वत:च्या नावावर करू शकतो. विशेष म्हणजे विराट समोर असलेल्या विक्रमांपैकी अनेक विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. वनडे करिअरमध्ये सर्वात वेगाने 12 …
Read More »तब्बल 45 तासानंतर स्मिथने घेतली पहिली धाव
सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेट विश्वातील सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. एखाद्या क्रिकेट सामन्यात धावा जमवण्यासाठी त्याला फारसा संघर्ष करावा लागत नाही, मात्र न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात स्मिथला पहिली धाव करण्यासाठी तब्बल 45 मिनिटे आणि 39 चेंडूंचा सामना करावा लागला.सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसर्या …
Read More »टीम इंडियाचे ‘मिशन 2020’
उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध टी 20 मालिका रंगणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थानववर्षात श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेने भारताच्या मोहिमेची सुरुवात होणार आहे. उभय देशांमध्ये 5 जानेवारीपासून ही मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील विशेषकरून तीन महत्त्वाच्या कामगिरीवर लक्ष असणार आहेत. ते खेळाडू म्हणजे लोकेश राहुल, शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह.श्रीलंकेच्या भारत दौर्याची सुरुवात …
Read More »रायगडात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
अलिबाग : प्रतिनिधीफटाक्यांची आतषबाजी करीत रायगड जिल्ह्यामध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदा सुटीचा दिवस नव्हता तरीही किनार्यांवरील गाव-वाड्यांमध्ये पर्यटक हजारोंच्या संख्येने आले होते. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, बोर्ली पंचतन, काशिद, आवास, नागाव, …
Read More »उरणमध्ये तेलाचा कंटेनर उलटून वाहतूक ठप्प
उरण : बातमीदारतालुक्यातील न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाजवळ बुधवारी (दि. 1) तेलाचा एक कंटेनर उलटला. त्यामुळे तेल रस्त्यावर पसरून वाहतूक जवळपास पाच ते सहा तास ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून निघालेल्या ट्रायटोन मल्टिमोडल लिमिटेड कंपनीच्या ट्रेलरवरून नेण्यात येणारे दोन 20 फुटी कंटेनर न्हावा-शेवा पोलीस …
Read More »खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंवर नाराज?
‘त्या’ फेसबुक पोस्टद्वारे चर्चेला उधाण मुंबई : प्रतिनिधीशिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे आता उघड झाले आहे. याचे कारण आहे एक फेसबुक पोस्ट. राऊत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून उद्धव यांच्यावर निशाणा साधला असून, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper