Breaking News

Pravin Gaikar

वाहन चोरणारी दुकल अटकेत

पनवेल : वार्ताहर – रिक्षा, मोटरसायकल यांसारखी वाहने चोरणार्‍या दोन सराईत चोरट्यांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. सुरज लक्ष्मण झावरे (19) आणि शोहेब सलीम पठाण (21) अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी पनवेल भागात केलेले तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या दोन ऑटो …

Read More »

थर्टी फर्स्टची पार्टी करणार्यांनो सावधान!

पनवेल तालुका पोलिसांचा इशारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार्म हाऊसवर कडक निर्बंध पनवेल : वार्ताहर – थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील अनेक फार्म हाऊसवर पाटर्या आयोजित केल्या जातात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अशा प्रकारच्या पार्ट्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन व गैरकृत्य करणार्‍यांवर पनवेल तालुका पोलिसांचा वॉच असणार आहे. त्यांच्यावर …

Read More »

अतिलोकशाहीचे दुष्परिणाम

एखाद्या महाप्रकल्पाच्या विरोधात कोर्टकज्जे सुरू करून त्यात खीळ घालणे, एखाद्या योजनेमध्ये हितशत्रूंनी अडथळे आणणे, एखाद्या कायद्याबद्दल यथेच्छ राजकारण करणे असे प्रकार आपल्या देशात नित्यनेमे घडत असतात. त्यामुळे विकासाची गती मंदावते हे खरेच. अर्थात लोकशाही मूल्यांपेक्षा विकास मोठा असतो असा त्याचा अर्थ कुणी काढू नये. लोकशाही मूल्यांची पाठराखण करतच विकास साधता …

Read More »

संधीसाधूंचे गंगास्नान

विरोधीपक्षांपैकी बहुतेक पक्षांनी संसदेमध्ये नवे कृषी विधेयक मंजूर करताना त्यास आपले समर्थन दिले होते. आता अचानक कोलांटउडी मारून त्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामागे त्यांचे दोन स्पष्ट हेतू दिसतात. एक म्हणजे मोदी सरकारला कोंडीत पकडणे आणि दुसरा हेतू म्हणजे नव्या कायद्यामुळे बंद पडू पाहणारी आपापली राजकीय दुकाने वाचवणे.केंद्रातील …

Read More »

उरण नगर परिषद मुख्याधिकार्यांची गांधीगिरी

मास्क वापरण्याचे आवाहन उरण ः प्रतिनिधी – उरण शहरात काही नागरिक मास्क लावताना दिसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन उरण नगर परिषदेचे  मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शुक्रवारी (दि. 4) विनामास्क नागरिकांना मास्क व गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने मास्क लावण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी संतोष माळी यांनी आपल्या कर्मचारी टीमसोबत उरण शहरातील …

Read More »

मतदार नोंदणीसाठी आमदार महेश बालदी यांची जनजागृती

उरण ः वार्ताहर – नागरिकांना मतदान नोंदणी करण्यासाठी माहिती मिळावी या उद्देशाने भाजप उरण तालुका व आमदार महेश बालदी यांनी उरण येथे ठिकठिकाणी मोक्याच्या ठिकाणी बॅनर्स लावून जनजागृती केली आहे. मतदान करणे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये ही रास्त अपेक्षा असते. मतदार यादीत नाव येण्यासाठी कोणता …

Read More »

तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखान्याला आग

अग्निशमन जवानाचा गुदमरून मृत्यू पनवेल ः वार्ताहर – तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आणखी काही जवानांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती मिळत आहे. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव आहे. औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे 39वर …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून डम्पिंग ग्राऊंडची पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त – पनवेल रेल्वेस्थानकालगत व निवासी इमारतींच्या परिसरात पनवेल महापालिकेमार्फत तयार केलेले डम्पिंग ग्राऊंड आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे डम्पिंग ग्राऊंड लवकरात लवकर बंद करून दुसरीकडे हलवावे, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

बिर्ला कार्बन कंपनीकडून सॅनिटायझर, मास्कचे वाटप

मोहोपाडा ः प्रतिनिधी – बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश देसाई व सामाजिक विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या प्रयत्नाने वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर …

Read More »

मराठी व्यावसायिक नाट्यप्रयोगांसाठी नाट्यगृहाच्या भाड्यात सवलतीची मागणी

पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका अखत्यारितील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगाच्या भाड्यात कोविड नियमावली लागू असेपर्यंत सवलत द्यावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात …

Read More »