Breaking News

संपादकीय

बालकांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका

बालकाची जडणघडण ही आई-बाबा, परिसर, समाज, शाळा व त्याला मिळणार्‍या सभोवतालच्या शिक्षणावरच अवलंबून असते. सहज पाहता असे लक्षात येते की, अतिलाडामुळे श्रीमंत घरातील मुले ऐदी होतात. तर सामान्य कुटुंबातील प्रतिकूल वातावरणातील मुले मेहनतीने स्वबळावर उभे राहताना दिसतात. म्हणजे पालकांच्या शिक्षणाबरोबर आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत असतो. लहान …

Read More »

वाचाळवीरांची सत्ता

आपत्तींच्या मालिकेमधून सावरू पाहात असलेल्या महाराष्ट्रात काही राजकीय नेते निव्वळ सत्तेच्या खेळात रमून गेलेले दिसतात. त्यांच्यात सुरू असलेली हमरीतुमरी आणि रंगलेली थपडांची भाषा आपल्याकडील राजकारणाचा स्तर किती खालावला आहे हेच दाखवून देते. थप्पड मारू, थोबाड फोडू असली भाषा सत्ताधार्‍यांच्या तोंडी अजिबात शोभत नाही, तरीही काही सत्ताधारी नेत्यांनी गेल्या चार दिवसांमध्ये …

Read More »

आश्वासनांचा महापूर

रोजचा खर्च भागवण्यासाठी एक दमडी देखील नाही आणि पुढला आठवडाभर तरी बँका सुरू होण्याची शक्यता नाही, अशा स्थितीत महापुरात सर्वस्व गेलेेल्या हजारो कुटुंबांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. 10 हजार रुपयांची तत्काळ मदत राज्य सरकारने तातडीने जाहीर केली असली, तरी एक नवा पैसा देखील पूरग्रस्तांच्या हाती लागलेला नाही. हे …

Read More »

कर्जत-शिरूर राज्यमार्गाने पश्चिम महाराष्ट्र जोडणार?

मराठवाडा आणि नगर भागातून येणारी वाहने पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करतात.त्यावेळी वाहतुक कोंडी सातत्याने होत असताना या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने शिरूर-कर्जत या नवीन राज्यमार्गाचे सर्वेक्षण सुरू केले आहे.दरम्यान,140 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या सर्वेक्षण कामासाठी दोन कंपन्यांनी निविदा स्वीकारल्या असून त्या कंपनीवर वन जमिनीच्या परवानग्या मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली …

Read More »

शेकापचा उतरता आलेख

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. पक्षाची ध्येय-धोरणे आणि विचारसरणीशी निष्ठा असणारा ऋषितुल्य नेता निमाला. अभ्यासू, संयमी आणि प्रचंड जनसंपर्क असलेल्या या नेत्याला आपल्या अखेरच्या काळात पक्षाची झालेली पडझड पाहून दुःख वाटत होते. शेकापच्या वर्धापन दिनाला दोनच दिवस उरले असताना त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर, …

Read More »

दीर्घकालीन संपत्ती निर्मिती – मिडकॅप फंड

म्युच्युअलफंडात गुंतवणूक करणार्‍या भारतीय नागरिकांची संख्या वाढत असून त्यांना परतावाही चांगला मिळतो आहे. त्यातही डायरेक्ट मिडकॅप फंड अधिक परतावा देताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे भविष्यात लार्जकॅप होण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांत ही गुंतवणूक केली जाते. शेअर बाजार व म्यच्युअल फंडाचे नियमन करणार्‍या सिक्युरिटीज् अ‍ॅण्ड एक्सेंज बोर्डाने (सेबी) म्युच्युअल फंडांना त्यांच्या …

Read More »

झोमॅटोचे बाजारमूल्य ही मोठ्या बदलाची नांदी का आहे?

सातत्याने तोट्यात असलेल्या झोमॅटो कंपनीचे बाजारमूल्य ती शेअर बाजारात लिस्ट होताच एक लाख कोटी रुपयांच्या वर जाते आणि चार पाच दशके प्रमुख कंपन्या असलेल्या कंपन्याही तिच्या मागे पडतात. अविश्वसनीय वाटणारी ही घटना आगामी काळातील मोठ्या बदलांची नांदी का आहे? पंजाबमधील 38 वर्षांचा दिपींदर गोयल हा तरुण, सध्या चर्चेत असलेल्या झोमॅटो …

Read More »

वृक्षो रक्षति रक्षित:

पर्यावरणातील सर्वात प्रमुख घटक म्हणजे झाडे. झाडांच्या विपुलतेवर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्गातील सर्व सजीव आपापल्यापरीने सृष्टीला अन्नाच्या बदल्यात काही ना काही परत करत असतात. ज्यामुळे निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी मदत होते. केवळ माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो निसर्गाकडून सतत खूप काही ओरबाडून घेण्यातच दंग आहे. आणि …

Read More »

ठेविले अनंते तैसेचि रहावे

मुसळधार पावसामुळे घरसंसारातील होते नव्हते ते सारे वाहून गेले. कोरोनामुळे अनेकांचे सर्वस्व आधीच पणाला लागलेले होते. इकडे आड आणि तिकडे विहिर अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्राची निम्मी अधिक जनता कसेबसे दिवस कंठत आहे. तरीही निर्बंधांचा काच बराचसा कमी करून नागरिकांना तत्परतेने मोकळीक द्यावी असे महाविकास आघाडी सरकारला वाटत नाही. अद्यापही एक-दोन …

Read More »

दिदी के हसीन सपनें

ममता बॅनर्जी सध्या पाच दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी निरनिराळ्या विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध भारत अशी असेल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. मोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. इतकेच …

Read More »