Breaking News

संपादकीय

पोलादपूरचा वर्षा पर्यटन र्हास

हिरवा शालू पदर।शिरावर घेऊनी जरतारी। चालली सावित्री सासरी॥ डोंगर-राने मार्गी आडवी।काटे खड्डे पायी तुडवी। कडे कपारी उडी घेऊनी।निघे पुढे सत्वरी। चालली सावित्री सासरी॥ ’सोनपंखी’कार वसंत पालकर यांनी पोलादपूर तालुक्यातील मुख्य नदी सावित्रीचे केलेले हे वर्णन घोडवनी, कामथी, चोळई, ढवळी या अन्य नद्यांबाबतही साम्यदर्शक आहे. 25 जुलै 2005च्या अतिवृष्टी, भूस्खलन आणि …

Read More »

मंत्रालय की मद्यालय?

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आणखी किती वेळा पहावा लागणार आहे, कोण जाणे? ज्या ठिकाणाहून अकरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या कारभाराची मंत्रणा होेते, त्या मंत्रालयाच्या प्रांगणात दारुच्या बाटल्या सापडायला लागल्या आहेत. हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यकर्त्यांनी त्याबद्दल दाखवलेली अनास्था आश्चर्यकारक म्हटली पाहिजे. मंत्रालय हे लोकशाहीचे पवित्र मंदिर …

Read More »

अस्मितेच्या मशाली पेटल्या!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्रांनी पुकारलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. 10 जूनला मानवी साखळी आंदोलन, 24 जून रोजी सिडको घेराव आंदोलन आणि आता मशाल मोर्चाने वातावरण ‘दिबा’मय होऊन गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, …

Read More »

नीरजचा सुवर्णाध्याय

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारताने ऑलिम्पिकच्या अ‍ॅथेलेटिक्स प्रकारात मिळविलेले हे पहिले, तर वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक आहे. नीरजच्या पदकासह भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सात पदके जिंकलीत. खेळाडूंची मेहनत आणि मोदी सरकारची साथ यातून हे साकारलेय. खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक …

Read More »

या आठवड्याचे ट्रेड

एचसीएल टेक्नॉलॉजी (HCL Tecnologies LTD) एचसीएल टेक्नॉलॉजी या स्टॉकने वन वीक टाइम फ्रेममध्ये ब्रेकआऊट दिलेला आहे. या शेअरचा सध्याचा भाव आहे 1050 रुपये आहे. या शेअरला आपण 1055-1030च्या रेंजमध्ये खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट असेल 1080 / 1100 / 1120 आणि स्टॉपलॉस असेल 1020. टार्गेट पुढील 8/10 दिवसांमध्ये येऊ …

Read More »

कर सवलतीसाठीचा उत्तम पर्याय : ईएलएसएस

आर्थिक वर्ष संपताना म्हणजे मार्चमध्येच कर सवलत कशी मिळवावी, असा विचार अनेक जण करतात आणि नको त्या गुंतवणुकीचा निर्णय घेवून बसतात, पण तो विचार आताच केला तर भविष्यात अडचणी न वाढविणारी गुंतवणूक आपण करू शकतो. ती गुंतवणूक म्हणजे ईएलएलएस म्युच्युअल फंड होय. प्राप्तीकरावर सवलत मिळण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, …

Read More »

कर पद्धतीत आशादायक बदलाच्या दिशेने जाणारे धाडसी पाऊल

पूर्वलक्ष्यी प्रभावाने करवसुली करण्याचा अधिकार देणारा कायदा रद्द करून सरकारने धाडसी पाऊल उचलले आहे. आता सर्वसामान्य करदात्यांची सध्याच्या कर पद्धतीच्या गुंतागुंतीतून सुटका करून आदर्श ठरू शकणार्‍या बँक व्यवहार करासारख्या कर पद्धतीकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारण्याचा अधिकार सरकारला देणारा कर कायदा अखेर रद्द झाल्यामुळे सध्या उद्योग …

Read More »

खेलरत्नांची खाण

ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला दाद देण्यासाठी बहुतेक सर्वच प्रसिद्धीमाध्यमे पुढे सरसावली. सोशल मीडियावर लोकांनी भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा अक्षरश: वर्षाव केला. अजुनही तो सिलसिला चालूच आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये हे यश मिळवले आहे हे विसरता कामा नये. कोरोनाच्या महासाथीमध्ये सरावासाठी वेळ देणे मुश्किल झाले होते. संसाधनांची कमतरता …

Read More »

रायगडात काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

जुलै महिन्यात अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप या दोन काँग्रेस नेत्यांचे निधन झाले. दोन्ही नेते जनाधार असलेले होते. त्यांची स्वतःची अशी ओळख होती. या दोन नेत्यांच्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वहीन झाला आहे. जनाधार असलेला आणि संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करू शकेल असा नेताच रायगड …

Read More »

तर्कशून्य निर्बंध

उपनगरी रेल्वे सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. ती बंद ठेवून कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सूचना हास्यास्पद वाटते. कार्यालये सुरू झाल्यानंतर संबंधित संस्था व आस्थापने आपापल्या कर्मचार्‍यांना कार्यालयात रुजू होण्याचा आदेश देतील. परंतु कर्मचार्‍यांनी कार्यालयात पोहोचायचे तरी कसे? रेल्वे सेवा बंद असली तरी बस सेवा सुरू आहे. या बसमधील गर्दी …

Read More »