Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात पावसाचा जोर कायम; पोलादपूरमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल

महाड : प्रतिनिधी संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर बुधवारी (दि. 6)देखील कायम होता. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली असून एनडीआरएफचे महाडमध्ये आलेले आणखी एक पथक पोलादपूर येथे पाचारण करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे महाडकर नागरिकांमध्ये भय …

Read More »

उद्धव ठाकरेंनी प्रति’मातोश्री’ तयार केली : आ. भरत गोगावले

मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी प्रति‘मातोश्री’ तयार केली आहे त्यामुळे त्यांच्या मातोश्रीवर आम्ही जाऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नव्या सरकारसंदर्भात भाष्य केले. आमदार गोगावले म्हणाले, ‘मातोश्री’ हे ठिकाण बाळासाहेब …

Read More »

दरडबंदीऐवजी घाटबंदीचा अजब उपाय

पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट आणि आंबेनळी घाट तसेच कुडपण घाट, चिपळूण खेडदरम्यानचा रघुवीर घाट आणि परशुराम घाट, महाड तालुक्यातील वरंध, भोरघाट दरडी कोसळण्यावर प्रतिबंध न झाल्याने बंद होऊ घातले आहेत. दरडबंदीचे उपाय करण्याऐवजी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू कामातून …

Read More »

महाडमधील जमिनीला पडलेल्या भेगेची भूवैज्ञानिकांकडून पहाणी

प्राथमिक तपासांती कोणताही धोका नसल्याची माहिती अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे येथे पावसामुळे भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी बावळे गाव परिसराला भेट …

Read More »

आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावलेंकडून चोळई येथील दरडग्रस्त भागाची पाहणी

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त चोळई येथे आमदार प्रवीण दरेकर आणि भरत गोगावले यांनी मंगळवारी (दि. 5) भेट देऊन पाहणी केली. या भागात तातडीने मदत देण्याचे निर्देश आमदारद्वयीने दिले तसेच येथील स्थानिक नागरिकांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांना सर्वार्थ मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी …

Read More »

रायगडात जोरदार पाऊस; सखल भागांत पाणी साचले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मंगळवारी (दि. 5) सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सतत पडणार्‍या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीदेखील दिवसभर अधूनमधून …

Read More »

आमदार महेंद्र थोरवे यांचे कर्जतमध्ये स्वागत

कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे कर्जत येथून मुंबई येथे 17 जून रोजी विधानपरिषद निवडणुकीसाठी गेले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी थोरवे हे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी तसेच विश्वासदर्शक ठराव जिंकूनच कर्जत येर्थे आपल्या मतदारसंघात पोहचले. चार जुलैच्या रात्री कर्जत येथे पोहचलेले आमदार महेंद्र …

Read More »

केरळ ते मक्का पायी प्रवासासाठी निघालेला सिहाबुद्दीन छोटुरचे माणगावात स्वागत

माणगाव : प्रतिनिधी मलपुरम (केरळ) ते मक्का मदिना असा पायी प्रवासासाठी निघालेल्या सिहाबुद्दीन छोटुरचे सोमवारी (दि. 4) सकाळी 10 वाजता माणगाव नगरीत आगमान झाल्यानंतर येथील मुस्लिम बांधवांनी त्याचे जोरदार स्वागत केले. सिहाबुद्दीन छोटुर हा 30 वर्षीय तरुण  मलपुरम येथून मक्का मदिनाला जाण्यासाठी 2 जून 2022 रोजी आपल्या घराबाहेर पडला. मलपुरम …

Read More »

पोलादपूर एसटी स्थानकात सांडपाण्याच्या खड्डयावर बांधले नवे स्वच्छतागृह

पोलादपूर : प्रतिनिधी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पोलादपूर बसस्थानकात असलेल्या गळक्या स्वच्छतागृहाच्या  सांडपाण्यासाठी स्थानकाच्या आवारातच खणण्यात आलेल्या खड्ड्यावर नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. पोलादपूर एसटी स्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी पुर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील गटाराला मिळण्यासाठी सिमेंटकाँक्रीटचा पाईप टाकण्यात आला होता. मात्र, चौपदरीकरणाच्या कामात महामार्गालगतचे गटार फोडण्यात आल्यानंतर एसटी स्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी …

Read More »

भाजप भटके विमुक्त मोर्चाच्या सहसंयोजकपदी तुकाराम आखाडे

कर्जत : बातमीदार भाजप भटके विमुक्त मोर्चाच्या रायगड जिल्हा सहसंयोजकपदी माथेरानमधील तुकाराम बाबू आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते तुकाराम आखाडे यांना नुकताच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भटके विमुक्त जाती जमातीच्या न्याय्य हक्कासाठी सदैव कार्यरत राहण्याचा मनोदय आखाडे यांनी या वेळी व्यक्त …

Read More »