Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू, सात जण जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास सहा वाहनांच्या विचित्र अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. एक्स्प्रेस वेवर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ एका ट्रकचा (एमएच 12 एसएक्स …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत निजामपूर संघ विजेता

माणगाव ः प्रतिनिधी येथील मंगु स्टार क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेत राहीला इलेव्हन निजामपूर संघाने अंतिम सामन्यात आय्यान इलेव्हन माणगाव संघाचा दारुण पराभव करीत वाकडाई चषक पटकाविला. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात राहीला इलेव्हन संघाचा फलंदाज अक्षय म्हात्रे याने शतकी खेळी केली. त्याने केवळ …

Read More »

पेण तालुका क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार; आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही

पेण ः प्रतिनिधी पेण तालुका क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी दिली आहे. शहरातील तालुका क्रीडा संकुलात झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आले असता ते बोलत होते. आमदार रविशेठ पाटील यांच्यासमवेत नगराध्यक्ष प्रितम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, बांधकाम …

Read More »

14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा : रायगडचा सुपर लीगमध्ये प्रवेश

अलिबाग ः प्रतिनिधी नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रायगडने  गटात अव्वल स्थान मिळवून सुपर लीगमध्ये प्रवेश केला. स्पर्धेत रायगडचा शेवटचा साखळी सामना औरंगाबाद संघाविरुद्ध होता. औरंगाबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने 71.2 षटकांमध्ये 242 धावा केल्या. औरंगाबादचा आरेझ खान …

Read More »

प्राथमिक शिक्षक पतपेढीचा कारभार संगणकावर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचा कारभार यापुढे संगणकावर चालणार आहे. सर्व शाखा आता संगणकीकृत झाल्या आहेत. पुढील काही दिवसात पतपेढीत आरटीजीएस व एनइएफटी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा पतसंसथेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी दिली. पतपेढीच्या अलिबाग, महाड, माणगाव व मंडणगड या शाखेच्या सभासदांचा मेळावा …

Read More »

कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

कर्जत : प्रतिनिधी सत्तारूढ शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीने कर्जत नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सोमवारी (दि. 14) झालेल्या निवडणुकांमध्ये वर्चस्व सिद्ध केले आहे. चारही विषय समित्यांवर महायुतीचे सभापती बिनविरोध विराजमान झाले आहेत. कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात सोमवारी विषय समित्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी  तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन …

Read More »

‘रुग्णोपयोगी साहित्य केंद्र रुग्णांसाठी आधार बनेल’; नेरळ येथे केंद्राचे उद्घाटन

खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने नेरळमध्ये नव्याने सुरू केलेले रुग्णोपयोगी साहित्य केंद्र हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आधार केंद्र बनेल, असा विश्वास नेरळमधील सुप्रसिद्ध डॉ. अश्विनी कर्वे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती गेली 49 वर्षे महाराष्ट्रामध्ये गरीब, गरजूंसाठी, वनवासी वाड्यांवर तसेच आपत्तीमध्ये अविरत सेवेचे …

Read More »

‘नेमको’ कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप आक्रमक; व्यवस्थापनाला दिले आमदार प्रशांत ठाकूर यांचे निवेदनपत्र

खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीतील नेमको कंपनीतील स्थानिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी खालापूर भाजप आक्रमक झाली असून भुमिपुत्रावर अन्याय करू नका तसेच नोकरीत भुमिपुत्रांना प्राधान्य द्या अशा आशयाचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे मागणीपत्र खालापूर भाजपने सोमवारी (दि. 14) निमको कंपनी व्यवस्थापनाला दिले. या पत्राची कंपनी व्यवस्थापनाने दखल …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणासाठी माथेरान नगर परिषदेकडून तयारीला वेग

कर्जत : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी माथेरान नगर परिषदेने आतापासूनच कंबर कसली आहे. अधिकारी स्वतः प्रत्येक विभागात जाऊन स्वच्छतेविषयी पाहणी करीत आहेत. मागील वर्षी क्रमांक न आल्याने येणार्‍या सर्वेक्षणात चांगली कामगिरी करून माथेरानचे नाव उंचावण्याचे आव्हान नगर परिषदेच्या प्रशासनावर आहे. त्यासाठी जुन्या झाडांचा सर्व्हे, रंगरंगोटी, जागोजागी स्वच्छता याकडे विशेष …

Read More »

माणगावात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

माणगाव : प्रतिनिधी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, त्यांचे  उल्लंघन केल्यास आता मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशी कारवाई आपल्यावर होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल महाडिक यांनी येथे केले. रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत येथील वाहतूक पोलीस युनिटमार्फत माणगाव …

Read More »