Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बार्डी गावात ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिर; 200 जणांनी केली नोंदणी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील चिंचवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बार्डी गावामधील अंगणवाडीत ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 200 ग्रामस्थांनी घेतला. बार्डी गावातील निखिल कोळंबे, हेमंत कोंडीलकर, जगदीश मुने, संभाजी धुळे, दर्शन दळवी, तेजस कांबरी  या तरुणांनी गावातील अंगणवाडीत ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. चिंचवली ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

आंबा पिकाला राज्य शासनाची सापत्न वागणूक

कोकणातील पाच जिल्ह्यांना वेगवेगळे दर म्हसळा : प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आंबा व काजू या फळपिकांसाठी राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना लागू केली आहे. विमा उतरवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत निश्चित केली आहे, परंतु आंबा पिकासाठी विमा हप्त्याची रक्कम 70 रुपये (प्रति आंबा कलम) वरून विमा कंपन्यांनी …

Read More »

सुधागडात मासळीची आवक वाढली, भावही उतरले

मत्य खवय्यांची चंगळ; पर्यटकांनाही मेजवानी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील बाजारात नियमित ताजी मासळी उपलब्ध होत आहे. ती खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडत आहेत. समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे. परिणामी मासळीचे भाव मागील महिन्याच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी उतरले आहेत. 800 ते 1000 …

Read More »

भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त मुरूड पालिका कर्मचार्‍यांना मिठाईचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि. 20) जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ नेते जनार्दन सदाशिव तथा आण्णा कंधारे यांच्यातर्फे मुरूडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुरूड शेगवाडा येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्यातर्फे शनिवारी नगर परिषद कर्मचारी …

Read More »

द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात; एक ठार; सहा जण जखमी

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ढेकु गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेसात वाजण्याच्या  सुमारास भरधाव ट्रकने तीन कारना धडक दिली. या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाले. गंभीर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळू रा निवगुणे हा कॉलीस कारचा चालक ठार झाला. …

Read More »

व्यापार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना सहा वर्षे सक्तमजुरी

माणगाव सत्र न्यायालयाचा निर्णय माणगाव, पाली : प्रतिनिधी शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना माणगाव येथील सत्रन्यायालयाने गुरुवारी (दि. 19) सहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी हरिश्चंद्र गुडेकर याने सोन्याची देवाणघेवाण करण्याचा व्यवहार करण्यासाठी रमेश भिकमचंद परमार व इतर चार व्यापार्‍यांना 15 मार्च 2016 …

Read More »

अवकाळीने गुरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर

पेण : प्रतिनिधी  समुद्रात सतत निर्माण होणार्‍या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेले दोन महिने अवकाळी पावसाने संपुर्ण राज्याला वेठीस धरून शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 17 नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे पेण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कापलेली भातशेती भिजून गेली आहे. चार्‍यासाठी लागणारी वैरण (पेंढा) भिजल्यामुळे …

Read More »

काँग्रेसच्या जीवावर मोठा होऊन फणा काढणार्‍याला चिरडून टाकू

माणगावात वडेट्टीवारांचा खासदार तटकरेंवर निशाणा माणगाव : प्रतिनिधीकुणबी समाजोन्नती संघाच्या मुंबई येथील वसतिगृहासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मी माझ्या खात्यामार्फत दिला, मात्र बॅनरवर फोटो दुसर्‍यांचे लागले. काँग्रेसच्या जीवावर मोठा होऊन कुणी फणा काढीत असेल, तर त्याला चिरडून टाकण्याची ताकद निश्चितच काँग्रेसमध्ये आहे, असा टोला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय …

Read More »

पीक विमा हप्त्याची रक्कम कमी करावी

सुधागडमधील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना लेखी निवेदन पाली : रामप्रहर वृत्त पीक विमा योजने अंतर्गत नुकसानभरपाईची रक्कम लवकर मिळावी. तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम गेल्या वर्षी एवढीच करावी, अशी मागणी सुधागड तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे. किसन सन्मान शेतकरी गटाच्या वतीने या मागणीचे निवेदन बुधवारी (दि.18) तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी गणपत सितापराव, निलेश …

Read More »

महाडजवळ कारची डंपरला धडक; दोन जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या एका डंपरवर गुरुवारी (दि. 18) संध्याकाळी एक कार आदळली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले. महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे. तेथे सिमेंटने भरलेला डंपर (एमएच-46,बीएफ-1551) उभा होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास …

Read More »