Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत पोलिसांचा जिल्हा अधीक्षकांकडून सत्कार

कर्जत : बातमीदार ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या दोन जटिल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास केल्याबद्दल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुधवारी (दि. 17) कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा विशेष सन्मान केला. कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे गांजा तस्करी सुरू असल्याबाबतची खबर मिळताच कर्जतच्या पोलीस पथकाने अन्य जिल्ह्यात जाऊन तपास केला व आरोपींना अटक केली होती, तसेच …

Read More »

टोकेखार-सावली रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील टोकेखार-सावली रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. पावसाळ्यात या डोंगरातील दगड व मातीचे थर रस्त्यावर येतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मुरूड-रोहा मार्गावरील टोकेखार ते सावली या भागात मोठा डोंगर असून तो रस्त्यालगतच आहे. दरवर्षी …

Read More »

आरपीएलमधील चार खेळाडू महाराष्ट्र संघात

कर्जत ः बातमीदाररायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या रायगड प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत असलेल्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेस्ट झोन स्पर्धेसाठी हे चार खेळाडू रायगडचे  प्रतिनिधित्व करतील.उरण येथील जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी येथील एनआयएसएम क्रिकेट मैदानावर 25 वर्षाखालील टी-20 स्पर्धा सुरू आहे. या …

Read More »

खोपोलीतील एसएमएस कंपनीच्या जनसुनावणीत ग्रामस्थ आक्रमक

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी रुग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगाव येथे येऊ घातला असून जैविक कचर्‍यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत अनेक आजारांमुळे जीवनमान कमी होणार असल्याची भिती व्यक्त होत होती. त्यामुळे बुधवारी (दि.17) खोपोलीतील सॅम्युअल मॉल येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या …

Read More »

रायगड जर्नालिस्ट संघटनेकडून खोपोलीत पत्रकार कक्षाची मागणी

खोपोली : प्रतिनिधी नगर परिषदेतील कामकाजाबाबत वृत्तांकन करण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीत पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रायगड जर्नालिस्ट असोसिएशन या संघटनेने मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रायगड जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे …

Read More »

शिक्षक विजय दरेकर यांना वसंत डावखरे स्मृती पुरस्कार प्रदान

पोलादपूर : प्रतिनिधी नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोतवाल येथील माऊली प्रशालेमध्ये माध्यमिक शिक्षक असलेल्या विजय गोपाळराव दरेकर यांना यंदाचा कोकण विभाग वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाजप शिक्षक आघाडीतर्फे दरवर्षी गुणवंत शिक्षकांना वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. ठाणे येथे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल …

Read More »

माणगाव, श्रीवर्धन, म्हसळ्यात अवकाळी पाऊस; नागरिकांची तारांबळ; आंबा, काजू पिकांचे नुकसान

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी (दि. 17) पहाटेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. माणगावात बुधवारी पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. या काळात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपारी चार वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा जाणवत …

Read More »

एसटी संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मंदी; व्यापारी हवालदिल

श्रीवर्धन : प्रतिनिधी  एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे राज्यातील शाळा जवळ जवळ दोन वर्षे बंद होत्या. नुकताच शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात झाली होती, परंतु एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यामुळे खेडेगावातून शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांचे …

Read More »

खोपोलीत शांतता समिती बैठक

खोपोली : प्रतिनिधी त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगली झाल्या, या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी मंगळवारी (दि. 16) येथे केले. खोपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पवार उपस्थितांना मार्गदर्शन …

Read More »

माथेरानच्या घोडेवाल्यांसाठी रस्त्यावर बसविलेले पेव्हरब्लॉक काढले

कर्जत : बातमीदार माथेरानकडे येणार्‍या रस्त्याला क्ले पेव्हरब्लॉक बसविण्यात आले होते, मात्र त्यावरून पाय घसरून घोडे पर्यटकांसह पडण्याच्या घटना घडल्याने त्या रस्त्याच्या उतारावरील क्ले पेव्हर काढले. त्यामुळे माथेरानमधील घोडे पूर्वीप्रमाणे लाल मातीतून चालणार आहेत. माथेरानमध्ये एमएमआरडीएकडून पर्यावरणपूरक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दस्तुरीपासून माथेरानकडे येणार्‍या रस्त्यावर …

Read More »