मुरूड : प्रतिनिधी अलिबाग मुरूड मेडिकल असोसिएशन, जंजिरा मेडिकल असोसिएशन व जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमधील कल्याणी हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरात 170 जणांनी रक्तदान केले. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अलिबाग मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी, …
Read More »ड्रोनद्वारे गावठाण सर्व्हेकरिता सहकार्य करावे
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका गावठाण भूमापन प्रकल्प योजनेत भारतीय सर्व्हेक्षण विभाग (सर्व्हे ऑफ इंडिया) मार्फत जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतीचे सर्व्हे करण्यात येणार असून नागरिकांनी ड्रोनद्वारे सर्व्हेसाठी येणार्या अधिकारी, कर्मचार्यांना सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. रायगडचे …
Read More »नवी मुंबई महापालिकेची बेलापूर-कर्जत बस सेवा
कर्जत : बातमीदार नोकरी, शिक्षण, उद्योग, व्यवसाय तसेच दैनंदिन कामासाठी कर्जत तालुक्यातील प्रवासी मोठ्या संख्येने नवी मुंबईत जातात, मात्र एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे त्यांची गैरसोय व हाल होत होते. ते लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने बुधवार (दि. 17) पासून बेलापूर-कर्जत अशी बस सेवा सुरु केली आहे. आपल्या मागण्यांसाठी एसटी …
Read More »दिवेआगर मंदिरात मंगळवारी गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना
अलिबाग : प्रतिनिधी अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून येत्या मंगळवारी (दि. 23) दिवेआगर येथील मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील मंदिरातून 23 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दोघा सुरक्षा रक्षकांचा खून करून सुवर्ण गणेशाचा मुखवटा व दागिने मिळून एक किलो 600 ग्राम …
Read More »कर्जत तहसील कार्यालयाविरोधात मनसेचे धरणे आंदोलन
कर्जत : बातमीदार शासकीय कामातील दिरंगाईबाबत जाब विचारण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 18) कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या सर्व तक्रारीवर तहसीलदारांनी या वेळी चर्चा केली. कर्जत डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून मनसेचे कार्यकर्ते चालत तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे …
Read More »चरीत शेतामध्ये वीज कोसळली
रचून ठेवलेल्या भाताच्या भार्यांचे जळून नुकसान अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील चरी येथे बुधवारी (दि. 17) संध्याकाळी अनंत थळे या शेतकर्याच्या शेतात वीज कोसळली. त्यामुळे शेतात रचून ठेवलेल्या भाताच्या भार्यांना आग लागली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या शेतकर्यांनी, तसेच ग्रामस्थांनी धावपळ करून आग विझवली, मात्र अनेक भारे जळून नुकसान झाले. मागील …
Read More »एसटीच्या विलिनीकरणाला पाठिंबा
आझाद हिंद शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पोलादपूर : प्रतिनिधी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी महाड एसटी आगारातील कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला. तत्पूर्वी एसटी कर्मचार्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला संघटनेचा पाठिंबा असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी महाड तहसीलदार सुरेश काशिद यांच्याकडे सुपूर्द केले. महामंडळाचे राज्यशासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या पुढाकाराने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना निवेदन
पेण : प्रतिनिधी येथील रेल्वेस्थानकातील विविध मागण्यांसाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते वैकुंठ पाटील व पेणकर शाश्वत विकास समितीचे योगेश म्हात्रे यांनी समितीच्या शिष्टमंडळासह मुंबईतील भाजप कार्यालयात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पेण रेल्वे स्थानकातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. मी पेणकर आम्ही …
Read More »माथेरान-अमन लॉज शटल सेवेचे डबे वाढवावेत; पर्यटकांची मागणी
माथेरान : प्रतिनिधी अमन लॉज ते माथेरान या मिनीट्रेनला चार डबे आहेत. त्यातून जेमतेम शंभर प्रवाशांची ने-आण करण्यात येते. पर्यटन हंगामात या डब्यांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी होत आहे. माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे. येथील मिनीट्रेन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. नेरळ-माथेरान या मिनीट्रेनचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने माथेरानला …
Read More »भिवपुरी रोड रेल्वे संघटनेकडून प्रवासी वर्धापन दिन उत्साहात साजरा
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड स्थानकात बुधवारी (दि. 17) रेल्वे प्रवासी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी स्थानकातील महापुरुषांच्या प्रतिमांना आणि भिवपुरी रोड रेल्वे स्टंटाईन नावाच्या फलकाला पुष्पहार घालण्यात आला. कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन बुधवारी प्रवाशांना मिठाई वाटून साजरा …
Read More »