Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडमधील नाते गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड; आमदार डावखरेंचे प्रयत्न

अलिबाग : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील नाते गावाची निवड झाली आहे. भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने कोकण विभागातून एकमेव नाते गावाला हा बहुमान मिळाला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशपातळीवर ऊर्जा बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. …

Read More »

अविश्वास ठराव संमत थेट सरपंचांना ग्रामसभेचीही अग्निपरीक्षा

मुरुड : प्रतिनिधी अविश्वास ठराव संमत झालेल्या सरपंचांना आता ग्रामसभेचीही अग्निपरीक्षा द्यावी लागणार असून, तेथेच त्यांचे भवितव्य ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच निवडून आले आहेत. मात्र त्यांच्यापैकी काही सरपंचांकडे पुरेसे ग्रामपंचायत सदस्य नाहीत. अशा थेट सरपंचावर अविश्वास ठराव दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही थेट जनतेमधून …

Read More »

पेण पालिकेतील राजकीय हस्तक्षेपाविरोधात भाजप आमदार आक्रमक

संबंधित अधिकार्‍यांवर हक्कभंगाचा ठराव आणणार पेण : प्रतिनिधीपेण नगर परिषदेतील मुख्याधिकारी व गटनेते यांच्यातील वादात राजकीय हस्तक्षेप होत असून यामागे खासदार सुनील तटकरे हे राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत या विरोधात भाजपचे रायगड जिल्ह्यातील आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार रविशेठ पाटील …

Read More »

नियोजित पोलीस चौकीच्या ठिकाणी थाटले दुकान

कर्जत : बातमीदार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीने कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ गावाच्या नाक्यावर पोलीस चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र बंद असलेले पोलीस चौकीच्या जागेवर आता वडापावचे दुकान थाटण्यात आले आहे. दरम्यान, डिकसळ नाक्यावर पोलीस चौकीचे काम सुरू असल्याचे पत्र 2018 मध्ये नेरळ पोलीस ठाण्याला देणारी उमरोली …

Read More »

अलिबागेत शहीद पोलिसांना अभिवादन

अलिबाग : प्रतिनिधी देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना बुधवारी (दि. 21) जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस कवायत मैदान येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलनही झाले. पोलीस स्मृतिदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानात बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी …

Read More »

भातपीक वाचविण्यासाठी शेतकर्यांची धावपळ

शेतात चर खोदाई व थेट झोडणीला प्राधान्य माणगांव : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या चिंता वाढविल्या असून, तयार झालेले भातपिक वाचविण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे. या वर्षी दमदार पावसामुळे माणगाव तालुक्यात भातपिक जोमदार आले होते. मात्र परतीच्या पावसाने भातपिकाला झोडपले असून, पावसाचे पाणी शेतात साचून …

Read More »

नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत

भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती देवरेंची मागणी नागोठणे : प्रतिनिधी परतीच्या पावसाने नागोठणे विभागातील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाचे आदेश असतानाही अद्यापही या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झालेली नाही. परतीच्या पावसामुळे   झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती देवरेंची यांनी केली आहे.  महसूल विभागाच्या नागोठणे, …

Read More »

आदिवासी विद्यार्थीनींना सायकल वाटप

कर्जत : बातमीदार जाईन्स ग्रुप ऑफ भायखळा आणि जाईन्स ग्रुप ऑफ इनलँड सिटी जाइन्स ग्रुप माझगाव ग्रिन तसेच कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने व उद्योजक संतोष भोईर यांच्या पुढाकाराने आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ आदिवासीवाडीमधील समाजमंदिरात झालेल्या या सायकल …

Read More »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक

महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात गोमेंडी या दुर्गम गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. सर्वत्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच महाड तालुक्यात सोमवारी (दि. 19) एका लिंगपिसाट नराधमाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, …

Read More »

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात; एक जण गंभीर जखमी

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एका व्यक्तीवर कुत्र्यांनी हल्ला केला. तो हल्ला परतवताना तो रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी पनवेलला हलविण्यात आले आहे. कर्जतच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कपड्याचे दुकान असलेले …

Read More »