कर्जत ः बातमीदार – नेरळ पोलिसांनी गावठी दारू बनविणार्या हातभट्ट्याविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बेकरे येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात एक लाख 20 हजार रुपयांची गावठी दारू पोलिसांनी उद्ध्वस्त केली. नेरळ पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगल भागात गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने …
Read More »रोह्यात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ
बाजारपेठेत प्रचंड गर्दी; पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभर व राज्यभर लॉकडाऊन असताना सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत, परंतु अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा, दूध, भाजीपाला व मेडिकल सेवांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, मात्र या अत्यावश्यक सेवांमधील साहित्य खरेदीसाठी रोहा बाजारपोठेत प्रचंड गर्दी होताना दिसत …
Read More »आदर्श पतसंस्थेने गाठला 300 कोटींच्या व्यवसायाचा पल्ला
अलिबाग ः प्रतिनिधी – आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 300 कोटी सहा लाख रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा पल्ला गाठला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेला दोन कोटी 55 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेच्या एकत्रित व्यवसायात …
Read More »मजुरांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
नागोठणे ः प्रतिनिधी – नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे आणि कर्मचारी तसेच नागोठणे ज्वेलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोलमजुरी करणार्या 10 गरीब कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे सर्व रोजगार ठप्प झाला असून कामधंदा उपलब्ध नसल्यामुळे या मजुरांची उपासमार होत आहे. ही …
Read More »भाजप माणगाव तालुकाध्यक्षांकडून आदिवासीवाडीत धान्यवाटप
माणगाव ः प्रतिनिधी – जगभरात कोरोनाने हैदोस घातला असून यामुळे अनेक गावांतील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती ओढवलेल्या माणगाव तालुक्यातील वारक आदिवासी वाडीतील 100 कुटुंबांना भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्याचे वाटप करून दिलासा दिला आहे. सध्या जगभरात कोरोना महामारी पसरली आहे. त्यामुळे जनतेचे …
Read More »कळंब बाजारपेठ दोन दिवस बंद
कर्जत ः बातमीदार – कर्जतमधील कळंब या कर्जत-मुरबाड-शहापूर रस्त्यावरील गावात बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेत 23 मार्चपासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कळंब ग्रामपंचायत आणि कळंब व्यापारी फेडरेशनकडून 4 आणि 5 एप्रिल या कालावधीत बंद पाळण्यात येत असून सर्व दुकाने दोन दिवस …
Read More »दारूविक्री अड्ड्यांवर धाडसत्र
लाखोंचा मुद्देमाल जप्त; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई अलिबाग : रामप्रहर वृत्त – कोरोना (कोव्हीड-19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील सर्व परवाना धारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करणे बाबत आदेश पारित केले आहेत. तथापि काही समाज विघातक घटक याआदेशांची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पध्दतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती मिळत होती. त्यामुळे …
Read More »नागुर्ले येथील आदिवाडीतील कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धान्य वाटप
कर्जत ः तालुक्यातील नागुर्ले येथील आदिवाडीतील कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. या वेळी भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, दीपक बेहेरे, राजेश भगत, मंदार मेहेंदळे, घन:श्याम परांजपे, गायत्री परांजपे, सूर्यकांत गुप्ता, दिनेश भरकले उपस्थित होते. (छाया : विजय मांडे)
Read More »रिलायन्सकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांचे उत्पन्न बंद झाले असून त्यात या भागातील आदिवासी समाजालासुद्धा त्याचा फटका बसला आहे. अनेक आदिवासींच्या घरातील अन्नधान्य संपल्याने येथील रिलायन्स कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने विभागातील रोहे आणि पेण तालुक्यातील 25 आदिवासी वाड्यांवर जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात …
Read More »संचारबंदी आदेशाचा भंग; वाहनचालकांवर कारवाई
महाड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असताना जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करून संचारबंदी जारी करण्यात आली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यानुसार विनाकारण मोटरसायकलवरून फिरणार्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 500पेक्षा अधिक मोटरसायकलस्वारांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी …
Read More »