Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

दक्षिण रायगडमध्ये पाण्यासाठी वणवण

माणगावातील 30 गावे 30 वाड्या तहानेने व्याकुळ माणगाव : प्रतिनिधी : माणगाव तालुक्यातील 30 गावे व 30 वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून, तेथील ग्रामस्थांची मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने यंदा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी माणगाव तालुक्यातील 14 गावांना टँकरद्वारे …

Read More »

अवैध गावठी हातभट्टीवर कर्जत पोलिसांची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी : तालुक्यातील गौरकामत गावाच्या हद्दीतील जंगल भागात गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच कर्जतच्या पोलीस निरीक्षक तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देठे, नाईक सचिन नरुटे, महिला पोलीस नाईक दीपाली खडे, पोलीस शिपाई गजानन केंद्रे, वाकोजी कोलमकर, सागर नायकुडे, गणेश पवार यांच्या पथकाने पोलीस पाटलांच्या सहकार्याने बुधवारी (दि. …

Read More »

गीते यांच्या संपर्क कार्यालयाचे पेणला उद्घाटन

पेण : प्रतिनिधी : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या पेण येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री रवीशेठ पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांच्या हस्ते चिंचपाडा येथील ग्रामीण रुग्णालयशेजारील इमारतीच्या तळमजल्यावर करण्यात आले. पेण नगर परिषद क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हटकर वाड्यातील श्री गणरायाच्या …

Read More »

इंदापूरच्या सभेत शिवसेनेकडून तटकरेंचे वाभाडे

माणगाव : प्रतिनिधी : तटकरेंच्या घरात चार आमदार व एक जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही ज्यांना रायगड जिल्ह्याचे नंदनवन करता आले नाही, त्यांनी गीतेंवर टीका करू नये. आपल्याला तटकरेंना मुळासकट उपटून टाकायचे आहे. अनंत गीते त्यांची वाट लावणारच आहेत, पण येणार्‍या काळात तटकरे कुटुंबाला रायगड जिल्ह्यातून हद्दपार करू, असे जिल्हाप्रमुख रवी …

Read More »

नेरळमध्ये नववर्ष स्वागत यात्रेची तयारी

कर्जत : बातमीदार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत नेरळ गावात दरवर्षी मोठ्या जल्लोषात केले जाते. यंदाही नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे शनिवारी (दि. 6) नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गेल्या 15 वर्षापासून नेरळ गावात स्वागतयात्रा काढून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.  या …

Read More »

कर्जत वारे येथे बेसुमार जंगलतोड

साग आणि खैरासारख्या मौल्यवान झाडांची कत्तल कर्जत : बातमीदार तालुक्यातील वारे भागातील जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. किमान 15 एकर जागेतील जुनी झाडे तोडण्यात येत असून वन विभागाने परवानगी दिली असल्याचे झाडे तोडणार्‍या स्थानिक कामगारांनी सांगितले आहे, मात्र मौल्यवान समजल्या जाणार्‍या खैर आणि साग जातीच्या झाडांचीही मोठ्या प्रमाणात तोड …

Read More »

काँग्रेसला जमले नाही ते भाजपने करून दाखवले

भाजप नेते देवेंद्र साटम यांचे प्रतिपादन; श्रीरंग बारणे यांचा खालापूर तालुक्यात प्रचार दौरा खोपोली, खालापूर : प्रतिनिधी काँग्रेसने 50 वर्षे देशावर सत्ता उपभोगताना जेवढी कामे केली, त्यापेक्षा अधिकपटीने कामे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अवघ्या पाच वर्षात यशस्वीपणे करून दाखविली असल्याने देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाजपच्याच हाती सत्ता सोपवा, असे …

Read More »

कोथळीगडावरील पर्यटन धोक्यात; पाणी आटल्याने पेठ ग्रामस्थ संकटात

कर्जत : बातमीदार शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील किल्ला असलेल्या कोथळीगड (ता. कर्जत) येथील पाणी आटले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात गडदर्शनासाठी येणार्‍या पर्यटकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. या गडाच्या पायथ्याशी राहणार्‍या स्थानिक लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, पेठ गावातील पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन तेथे एक विहीर मंजूर करण्यात आली आहे. पुणे …

Read More »

आचारसंहिता संपताच एसटीला मिळणार नव्या बसेस 1300 नवीन एसटी गाड्या प्रतीक्षेत

पेण : प्रतिनिधी निवडणूक आचारसंहिता यामुळे एप्रिल ते जून या गर्दीच्या काळात टप्याटप्यात येणार्‍या नवीन एसटी बसची निविदा प्रक्रिया पूर्णपणे थांबली असून, त्यामुळे या नवीन बस गाड्या आत आचारसंहिता संपल्यानंतरच दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाने टू बाय टू परिवर्तन, स्लीपर आणि सीटर अशा दोन्ही सेवा असलेली एसटी तसेच वातानुकूलित शिवशाही …

Read More »

वानिवली पुलाच्या दुरुस्तीचा सा. बांधकाम विभागाला विसर

खोपोली : प्रतिनिधी आठ दिवसात वानिवली येथील पुलाचे संरक्षक कठङे दुरूस्ती करू, या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनाला आठ महिने होत आले तरी कामाला सुरुवात न झाल्याने प्रवासी संतप्त आहेत. खालापूर तालुक्यातील महत्वाचा राज्यमार्ग असलेल्या सावरोली – खारपाडा मार्गावरील वानिवली पुलाचा संरक्षक कठङा अखेरची घटका मोजत आहेत. ऑगस्ट 2018मध्ये या पुलाची …

Read More »