पनवेलमधील वांगणी तर्फे वाजेत विविध कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून वांगणी तर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 13) झाले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या …
Read More »सीकेटी विद्यालयात सरस्वतीपूजन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात मंगळवारी (दि. 12) सप्तमीला सरस्वती पूजन करण्यात आले. पर्यवेक्षिका निरजा मॅडम यांनी सरस्वतीची पूजा केली. तर सर्व शिक्षकांनी दीपप्रज्वलन करून देवीला वंदन केले. कार्यक्रमाची सुरूवात जिनल वालावलकर हिने दुर्गा …
Read More »सुकापूरमध्ये कोरोना लसीकरण शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना प्रादूर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर सुकापुर येथील अन्नपुर्णामंदिर औम शिवा सोसायटीमध्ये कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पालीदेवद ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता राजेश पाटील, माजी …
Read More »उरणमधील अपघात रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार
विविध उपाययोजनांसंदर्भात चर्चा आणि पत्रव्यवहार उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरणमधील सातत्याने होणार्या अपघातांवर आळा घालण्यासाठी अथवा रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्ष पूर्व विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पदाधिकार्यांनी आमदार महेश बालदी, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, ग्रामपंचायत खोपटे-बांधपाडा आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले आहे. …
Read More »महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे खालापूर तहसीलदारांना निवेदन
खोपोली : प्रतिनिधी भटके विमुक्त जाती जमातीच्या शासकीय पदोन्नतीमधील आरक्षण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ खोपोली शहर भाजपच्या भटके-विमुक्त सेल तर्फे खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, भाजप भटके-विमुक्त अध्यक्ष संतोष लोहार, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंदुलकर, …
Read More »अलिबागेत दोन ट्रकची समोरासमोर ठोकर, एकजण जखमी
अलिबाग : प्रतिनिधी येथील आरसीएफ कॉलनीजवळ बुधवारी (दि. 13) दोन ट्रकची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक जखमी झाला. त्याच्यावर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. उसर येथून एचपी गॅस घेऊन ट्रक चालक हा बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास …
Read More »द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा बर्निंग थरार
खोपोली, खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी मुबंई-पुणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री बाराच्या सुमारास एका आयशर टेम्पोने अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. मुबंईकडून पुण्याकडे जाणारा आयशर टेम्पो काही तांत्रिक बिघाड असल्याने महामार्गावरील रसायनी हद्दीत बंद पडला होता. पोलिसांच्या गस्ती पथकाने त्या टेम्पोला एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले होते. …
Read More »नेरळकर पीत आहेत गढूळ पाणी
जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याचा परिणाम कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ गेल्या काही दिवसापासून गढूळ पाणी पीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नेरळ पूर्व भागात गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चादेखील नेला होता. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणार्या योजनेतील …
Read More »कोर्टाची जनजागृती बाईक रॅली
पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण देशात जागरूकता आणि संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ हे घोषवाक्य घेऊन पेण न्यायालयाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. पेण न्यायालयाच्या न्या. आर. एन. मुजावर व सहदिवाणी न्या. पी. सी. …
Read More »नेरळमधील शिबिरात पाचशे महिलांचे लसीकरण
कर्जत : बातमीदार मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत कर्जत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सोमवारी (दि. 11) तब्बल 26 ठिकाणी लसीकरण शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंगेश म्हसकर मित्र मंडळाच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नेरळ गावात सोमवारी महिलांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. त्या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper