माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे 51 हजार रुपयांचा धनादेश बुधवारी (दि. 13) पतसंस्थेचे चेअरमन विद्यमान नगरसेवक आनंदशेठ यादव, संचालक दिलीप जाधव, नरेश राजपूत, दिलीप अंबुर्ले, अरुण प्रभाळे यांनी सुपूर्द केला. …
Read More »Monthly Archives: May 2020
महाडमधील परिचारिकेला कोरोना; रुग्णाकडून संसर्ग; ग्रामीण रुग्णालयात उपचार
महाड ः प्रतिनिधी महाडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णसेवेत असलेल्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या परिचारिकेवर ग्रामीण रुग्णालयातच उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाड तालुक्यातील कोकरे तर्फे नाते येथील मोरेवाडीतील कोरोना झालेल्या व्यक्तीला 4 मे रोजी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले होते. त्या वेळी सदरची परिचारिका कोकरे …
Read More »विशेष पॅकेज : विविध घटकांना मदत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अनेक घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यातून दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये काय काय असणार याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (दि. 13) पत्रकार परिषद …
Read More »उरण नगर परिषदेकडून करंजात जंतुनाशक फवारणी
उरण : वार्ताहरउरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील करंजा सुरकीचा पाडा, नवापाडा व कोंढरी आदी ठिकाणी गेल्या चार दिवसांत कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन उरण नगर परिषदेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून करंजा येथे जंतुनाशक फवारणी सुरू आहे. उरणचे आमदार …
Read More »म्हात्रे दाम्पत्याकडून विवाहाच्या वाढदिवसानिमित्त महापौर सहाय्यता निधीत 50 हजार रुपये सुपूर्द
पनवेल : रामप्रहर वृत्तविवाहाचा सुवर्णमहोत्सवी अर्थात 50वा वाढदिवस दाम्पत्याच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा आणि यशस्वी जीवनाच्या वाटचालीतील सुवर्णक्षण असतो. त्यामुळे 50वा विवाह वाढदिवस म्हणजे एक सोहळाच असतो व तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण पनवेलमधील के. जी. म्हात्रे व त्यांच्या सुविद्य पत्नी उर्मिला म्हात्रे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाहाचा वाढदिवस उत्सव …
Read More »नवनगरसाठी एजन्सी नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात
पनवेल : प्रतिनिधीमुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती केल्यानंतर आता नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये एकात्मिक औद्योगिक वसाहत म्हणजे नवनगर निर्मिती करण्याचे काम प्रगतिपथावर असून, या प्रकल्पासाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्राची मोजणी आणि सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती नवनगर विकास प्राधीकरणचे मुख्य भूमी व …
Read More »पनवेलमध्ये 17 नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीत 10 आणि ग्रामीणमध्ये सात अशा 14 नवीन रुग्णांची बुधवारी (दि. 13) तालुक्यात नोंद झाली. या रुग्णांमध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि नवीन पनवेलमधील वकिलाचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये नेरे येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील कोरानाबाधितांची संख्या 199 आणि तालुक्यातील …
Read More »उरणमधील करंजात आणखी 44 पॉझिटिव्ह
उरण : प्रतिनिधी, वार्ताहरउरण तालुक्यातील करंजा गावात बुधवारी (दि. 13) आणखी 44 कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा एकूण आकडा 105वर पोहोचला आहे. यातील सात जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर उर्वरित 98 रुग्णांवर कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.उरण तालुक्यात पहिल्या आठ कोरोना रुग्णांनंतर करंजा गावातील सुरकीचा पाड्यात …
Read More »मोदींनी फुंकले प्राण
लॉकडाऊनच्या ताणातून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकार पुढे सरसावले आहे. एकविसावे शतक हे भारताचे असेल. देश एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, हे मोदींचे उद्गार निराशेचे मळभ दूर करून देशाच्या अर्थव्यवस्थेत चैतन्याचे प्राण फुंकणारे आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजता मोदी बोलू लागले आणि त्यांनी देशाने आजवर कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व अशा 20 …
Read More »माणगावकरांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाला दूर ठेवावे; भाजप नेते संजयआप्पा ढवळे यांचे आवाहन
माणगाव : प्रतिनिधी संपूर्ण जगभर हैदोस घालणार्या कोरोना संसर्गजन्य विषाणूला दूर ठेवण्यासाठी माणगाव तालुक्यातील जनतेने सोशल डिस्टन्सिंगचे (सुरक्षित अंतर) पालन करा, असे आवाहन माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ढवळे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper