Breaking News

संपादकीय

धुळफेकीचे पॅकेज

महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या जनतेला एक छदाम देखील दिलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर अर्थसाह्याचा हा आकडा तुटपुंजा असला तरी स्वागतार्हच म्हणायला हवा. परंतु बारकाईने पाहू गेल्यास हे पॅकेज म्हणजे सरळसरळ धूळफेक असल्याचे कोणाच्याही लक्षात येईल. गहू-तांदूळ नेमके कुठून घेऊन यायचे, ते घरपोच मिळणार की रेशनच्या धान्य दुकानात, रस्त्यांवर संचारबंदी …

Read More »

माहिती तंत्रज्ञान : आता स्मार्टफोनद्वारे मन:शांती

तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे निर्माण होणार्‍या समस्यांमध्ये मनःशांती हरपल्याचा मुद्दाही काही जण जोडत असतात. आज मनःशांती हरवत चालली आहे, हे वास्तव आहे; पण तंत्रज्ञान हे त्याचे मुख्य कारण नाही. उलट आता याच तंत्रज्ञानाने मनःशांती मिळवून देण्याची किमया साधली जाणार आहे. यासाठी थिंकफ नावाचे उपकरण तयार करण्यात आले आहे. या उपकरणामुळे मन अधिक …

Read More »

महामानवाचे पुण्यस्मरण

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनच मानवकल्याणासाठी होते. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या उभारणीसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. किंबहुना, आज आपण लोकशाहीची मधुर फळे चाखत आहोत ती डॉ. बाबासाहेबांच्या अथक आणि अहर्निश परिश्रमांमुळेच, हे विसरता कामा नये. त्यांच्या कार्याचे विस्मरण म्हणजे संपूर्ण भारतीयत्वाचे विस्मरण मानायला हवे. या देशाला डॉ. बाबासाहेब …

Read More »

गुढी उभारू आरोग्याची

आज गुढीपाडवा. तमाम मराठी जनांचे नूतन वर्षाभिनंदन. गेले अवघे वर्ष आपण कोरोना महामारीशी झुंजण्यात व्यतीत केले. दुर्दैवाने आणखी एक गुढीपाडवा महाराष्ट्राला कोरोना महामारीच्या भीतीच्या छायेतच व्यतीत करणे भाग पडते आहे. अर्थातच राज्यातील सरकारी यंत्रणेचे अपयशच या परिस्थितीस जबाबदार आहे. सद्यस्थितीत जनतेने आपले कुटुंब आपली जबाबदारी म्हणत आपली काळजी घ्यावी आणि …

Read More »

टाळेबंदी : जनतेचे काय?

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची चिन्हे आहेत. खरेतर राज्यात सद्यस्थितीत लॉकडाऊनसदृश निर्बंध लागू असून, वीकेण्डला दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन आहे. आता पुढील निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. वैश्विक महामारी कोरोनाने जगभर कहर माजवलेला आहे. भारतातही त्याचा …

Read More »

अशा कंपन्या… सिर्फ नामही काफी है…

शेअर बाजाराच्या चढउतारांचा त्रास करून न घेण्याचा एक मार्ग म्हणजे मक्तेदारी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. भारतीय बाजारपेठेत वर्षानुवर्षे मक्तेदारी प्रस्थापित केलेल्या अशा काही कंपन्या. काही नावंच अशी असतात की त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीबाबत विशेष काहीच सांगावं लागत नाही. उदा. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सम्राट पेले आणि अनेक दिग्गज. अशाच …

Read More »

बँक ठेवी आणि बचत योजनांच्या व्याजदराचा पेच

बँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय सरकारने लगेच मागे घेतला असला तरीठेवी आणि बचत योजनांचे उतार वयातील आर्थिक संरक्षण, या अर्थाने महत्त्व कमीच होत जाणार आहे. त्यामुळेच पुढील पिढीने निवृत्तीच्या नियोजनात नव्या गुंतवणूक पर्यायांचा विचार आतापासूनच केला पाहिजे. सरकारी अल्प बचत योजनांचे व्याजदर कमी करण्यात आल्याची …

Read More »

तुटवड्याचे राजकारण

कोरोनाची पहिली लाट परतवल्यानंतर ढिल्या पडलेल्या आरोग्य व्यवस्थेला पुन्हा चौथ्या गिअरमध्ये आणणे राज्य सरकारला कमालीचे अवघड जात आहे. एकंदरीत पाहता कोरोनाच्या पहिल्या लाटेला यशस्वी तोंड देऊन स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारने दुसर्‍या लाटेसमोर मात्र सपशेल गुडघे टेकले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व महासंकट ओढवलेले आहे. एप्रिल महिन्याच्या …

Read More »

सर्वोच्च चपराक

माजी गृहमंत्र्यांनी निष्पक्षपातीपणाने आपल्या विरुद्धची चौकशी व्हावी या सद्हेतूने (?) आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु विरोधाभास एवढा की निष्पक्षपाती चौकशीचे स्वागत करणारे हेच माजी गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयात धावले ते चौकशी रद्द करण्याची मागणी करण्यासाठी. नेमके काय खरे मानायचे? आपल्या विरुद्धची चौकशी निष्पक्षपातीपणाने व्हावी हा त्यांचा खरोखर हेतू …

Read More »

सज्ज राहा… सावध राहा…! कोरोना नियमांचे पालन करा

राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने  शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत तर एरीळपस ेष ठशीीींळलींळेपी  झहरीशुळीश ेशिपळपस ेष श्रेलज्ञवेुप – चखडडखजछ इएॠखछ -ॠ-खछ अंतर्गत वेळोवेळी मानक कार्यप्रणालीचा (डजझ) अवलंब करुन, काही बाबी सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयानेही …

Read More »