श्रीवर्धन ः प्रतिनिधी संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचा वीजपुरवठ्याबाबत सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून दर दोन-तीन दिवसांनी वीजपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तब्बल 28 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू …
Read More »तणावापासून मिळवा मुक्ती
आरोग्य प्रहर तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा, संताप वाढतो. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अॅसिडिटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात. तणाव …
Read More »निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाईस विलंब
चौल व नागाव ग्रामपंचायतीचे तहसिलदारांना निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र ठरलेल्या चौल व नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी या ग्रामपंचायतींच्या वतीने अलिबाग तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निखिल मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागाव ग्रामपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळात मोठे …
Read More »राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी
कर्जत भाजपचे आंदोलन कर्जत : प्रतिनिधी केंद्र सरकारने शेतकर्यांच्या हिताचे मंजूर केलेले कृषी विधेयक बिल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लागू न केल्याने शेतकर्यांचे आतोनात नुकसान होत आहे. कर्जत तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारचा जाहीर निषेध करुन राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी करण्यात आली. अध्यादेश रद्द करावा, …
Read More »माथेरानमध्ये ई-रिक्षांना परवानगी द्या
भाजपचे राज्यपालांना साकडे कर्जत ः बातमीदारप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान येथे ब्रिटिशांनी घालून दिलेल्या नियमानुसार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर पर्यावरणस्नेही ई-रिक्षांना परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईतील राजभवन येथे भेट घेऊन केली आहे.या शिष्टमंडळात माथेरान येथील भाजप अध्यक्ष विलास पाटील, किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य …
Read More »टाळेबंदी काळात तब्बल साडेतीन कोटींचा दंड वसूल
रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेची कारवाई अलिबाग : प्रतिनिधीटाळेबंदीमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प पडले असताना रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेने तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर अडीच लाख जणांवर कारवाई करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. वाहतुकीवर निर्बंध आले. जिल्हाधिकारी यांनी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या …
Read More »दासगाव दरडग्रस्तांचे अपुरे पुनर्वसन;निधीअभावी घरांची कामे रखडली
महाड : प्रतिनिधीदासगावमधील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निधी राज्य शासनाकडून अद्याप पूर्णपणे देण्यात आलेला नसल्याने अनेक बाधित कुटूंबांची घरे अपूर्णावस्थेत आहेत. त्याचबरोबर नागरी सुविधांची कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे महाड तालुक्यातील दासगाव येथील सुमारे 35 घरे 26 जुलै 2005 रोजी जमीनदोस्त झाली होती. या दुर्घटनेत 40 जणांना जीव गमवावा लागला …
Read More »पेणमध्ये मूर्तीकारांनी केले रक्तदान
पेण : प्रतिनिधी – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वैच्छिक रक्तदान सप्ताह निमित्ताने श्रमिक थळ सामाजिक संस्थेच्या वतीने पेण तालुक्यातील कळवे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्या श्रमिक मंडळींकडून गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जातात त्यापैकी 77 कारागिरांनी या शिबिरात रक्तदान केले. …
Read More »वाढीव वीज देयकांविरोधात सुधागड मनसेचे आंदोलन
पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या महामारीत अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांनी सुधागड तालुक्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. वाढीव वीज देयके आणि महावितरणच्या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जनतेत प्रचंड संताप दिसून येत आहे. या संतप्त वीज ग्राहकांना घेऊन मनसेचे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी महावितरणच्या पाली येथील कार्यालयाला घेराव घातला. …
Read More »रोटरी क्लबकडून शेतकर्यांना मोलाचे सहकार्य
कर्जत : बातमीदार – रोटरी क्लब ऑफ देवनारने ग्रामीण रोटरी क्लबच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनेक माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये सामाजिक उपक्रम राबविले. आता त्यांनी शेलू, चई, मांडवणे, हेदवलीमध्ये शेतकर्यांना शेती बियाणे, पाणी शुद्धीकरण संच, जलशुद्धीकरण मशीन, बोअरवेल यांची मदत केली असून, त्याचे लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लबकडून शेलू ग्रामपंचायत हद्दीतील …
Read More »